मतदार संघाच्या विकासासाठी झटणाऱ्या देवेंद्र भुयार यांनाच संधी द्या – अमोल मिटकरी 

– हिवरखेड येथे आमदार अमोल मिटकरी यांच्या जाहीर सभेला विराट गर्दी ! 

मोर्शी :- मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रचारार्थ आमदार अमोल मिटकरी यांची जाहीर सभा गुजरी बाजार चौक येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी सभेला संबोधित करतांना म्हणाले की आपण जाती पातीच्या राजकारणात न पडता मतदार संघाच्या विकासासाठी शासनाकडे पाठपुरावा करून आरोग्य शिक्षण पाणी सिंचन पांदन रस्ते डिजिटल शाळा वसतिगृहे शासकीय कार्यालये ट्रॉमा केअर युनिट, महिला बाल रुग्णालय विविध आरोग्य केंद्रे उपकेंद्रे सिंचन प्रकल्प, रस्ते, अभ्यासिका, तीर्थक्षेत्र विकास, यासह विविध विकासकामे करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यावर विश्वास टाकून मागणी केलेली संपूर्ण ४ हजार ३७२ कोटी रुपयांची विकासकामे अजित पवार यांनी मंजूर करून दिली. मागील ७५ वर्षाच्या काळामध्ये एवढा निधी कधी मतदारसंघात आला नाही तेवढा निधी २ वर्षाच्या काळात आपण आणला असल्याचे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले.

यावेळी आमदार अमोल मिटकरी सभेला संबोधित करतांना म्हणाले, अनिल बोंडे ही व्यक्ती नसून विकृती आहे. अमरावती शहरात या व्यक्तीने दंगली भडकवण्याचं पाप केलं. यावरून ही व्यक्ती किती विकृत असली पाहिजे हे सर्व अमरावतीकरांना माहीत आहे. अनिल बोंडे बाहेरून जितके विषारी आहेत, तितकेच आतूनही विषारी आहेत. त्या व्यक्तीबद्दल बोलणं योग्य वाटत नाही.

दिल्लीच्या औरंगजेबाच्या सैन्याला संताजी आणि धनाजींचे घोडे पाण्यात दिसायचे. तसे आताच्या दिल्लीस्वराच्या सुलतानाला राष्ट्रवादी काँग्रेस पाण्यामध्ये दिसते. अनिल बोंडे ही व्यक्ती नाही मी खासदार म्हणून पाहत नाही. अमरावतीकरांना माहीत आहे की, ती विकृती आहे, असा घणाघात अमोल मिटकरी यांनी केला.

यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी मतदार संघातील जनतेला विकास करणारं नेतृत्व आमदार देवेंद्र भुयार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून देवेंद्र भुयार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा सरकार आपलेच येणार असून महाराष्ट्र राज्याचे २०२४ चे मुख्यमंत्री हे अजितदादा पवारच असतील त्यामध्ये आपले आमदार कुठे दिसतील ते आपल्याला चांगल माहित आहे त्यामुळे जाती पातीच्या राजकारणाला बळी न पडता आमदार देवेंद्र भुयार यांना मोठ्या मताधिक्याने निवडूण आणा असे प्रतिपादन आमदार अमोल मिटकरी यांनी जनतेला केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोदामेंढीत बीएलओ तर्फे मतदान चिट्ठ्यांचे वाटप

Fri Nov 15 , 2024
कोदामेंढी :- येथील मतदान यादी भाग क्रमांक 161 अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक दोन मध्ये आज 13 नोव्हेंबर बुधवार दुपारपासून मतदान चिट्ठ्यांचे वाटप बीएलओ सूर्यकांता बावनकुळे घरोघरी जाऊन करत आहेत. कुटुंबा तील दुपारी उपस्थित असणाऱ्या कोणत्याही एका सदस्याला त्या कुटुंबात मतदार असणाऱ्या सर्व सदस्यांच्या मतदान चिट्ट्या ते देत आहेत व मतदान चिट्ट्या दिल्याचे पुरावे म्हणून कुटुंबातील उपस्थित सदस्याचे स्वाक्षरी घेण्यात येत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com