मनोज डोरलीकर यांची गिट्टीखदान पोलीसांनी केली फसवणूक

नागपुर  – मी मनोज मोतीराम डोर्लीकर वय ३४ वर्षे रा. प्लॉट नं. १२६ , मोतीलाल नगर, दिघोरी, नागपूर येथील कायमस्वरुपी राहतो व आपणास नम्र निवेदन सादर करतो की, मी दि.२७/४/२०१९ रोजी जगदीश देवीदास जांगडे राह. प्लॉट नं. ६०, दत्त मंदीर रोड, वार्ड नं.२, चनकापूर पो. खापरखेडा, त. सावनेर जि. नागपूर व ओम यशवंत नागपूरे कळमना, नागपूर यांचे पासून त्यांचा नावाने दाखल असलेली स्थावर मालमत्ता जे की खास मौजा- झिंगाबाई टाकळी, प.ह.नं.११, खसरा नं.२६७११ यामध्ये साई सेवाश्रम सहकारी गृह निर्माण संस्था लि. नागपूर या संस्थेने टाकलेल्या लेआऊट मधील प्लॉट नं.२ बी, ज्याची आराजी ५००० चौ. फुट (४६४.५१०० चौ.मी.) ज्याचा कारर्पोरेशन घर क्र.११९०/ठ/२ वार्ड नं.६१ नगर भूमापन क्र. १०१९ शिट ८२ हा आहे. ही स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचा लेखी करारनामा केला होता व बयाना म्हणून एकुण रक्कम रुपये ६०,००,००० जगदीश जांगडे व ओम नागपूरे यांना दिले आहे . त्यानंतर विक्रीपत्राला लागणारे सर्व कागदपत्र मागीतले असतांना मला त्यांनी कागदपत्र देण्यास टाळाटाळ सुरु केली व मला नेहमी खोटे बोलत गेले त्यानंतर त्यांनी माझे कॉलही उचलने बंद केले त्यानंतर मी त्यांचा ऑफीस मध्ये जाळून भेटलो व त्यांना मी दिलेली ६०,००,०००/- रुपये परत मागीतले तेव्हा त्यांनी मला म्हटले की आखीव पत्रीका वर अजून नाव चढलेले नाही पुन्हा १ महीना लागेल मी तुम्हाला १ महीण्यानंतर विक्रीपत्र करुन देतो असे मला म्हणाले. त्यानंतर त्यांना मी या प्लॉटचे पॉवर ऑफ अटीर्णी करुन मागीतले त्यांनी मला २०/९/ २०१९ रोजी पावर ऑफ अटर्णी करुन दिली यांचे दस्त क्र.६४२ ९/२०१९ आहे . त्यानंतर त्यांनी सांगीतल्या प्रमाणे मी त्यांना १ महिण्यांनी फोन केले असता आज करुन उदया करु असे करुन अनेक महीने मला फिरवत राहले पण विक्रीपत्र करुन दिले नाही मी एके दिवशी सिटी सर्व ऑफीस मध्ये जावुन सदर प्लाटची आखीव पत्रीका साठी अर्ज केले असता मला माहिती मिळाली की, हा प्लॉट वेगळयाच इतर लोकांचा नावानी आहे. मी सदर इसमाला जावून भेटलो असता त्यांनी त्या प्लॉटची संपूर्ण कागदपत्र मला दाखविले मला कागदपत्र पाहून धक्काच लागला व मी त्यांच वेळेस नागपूरे यांच्याशी संपर्क साधला व त्यांना हकिकत विचारली व ओरीजनल मालकांशी पण फोन वर बोलणे करुन दिले असता त्यांनी आपला फोन बंद करून नागपूर मधून पसार झालेले होते. त्या दरम्यान ओरीजनल मालक यांनी मला रनधीर झवेरी यांचाशी भेट करुन दिली व मला म्हटले की यानंतर तुम्ही यांचा संपर्कात राहा असे सांगितले. मी सतत झवेरी यांच्या संपर्कात होतो व नागपूरे व जांगडे यांचा शोध घेत होतो मी पोलीस तक्रार करणार होतो परंतु झवेरी यांनी मला पोलीस तक्रार करू दिली नाही व मला समजवीले की आपण नागपूरे व जांगडे यांना भेटून काहीतरी मार्ग काढू व आपण दिलेले ६०,००,०००/ – रुपये परत होवू या झवेरीच्या खोटया आश्वासनावर मी विश्वास ठेवला अनेक दिवसानंतर माझा नागपूरे यांचा सोबत संपर्क झाला व मी नागपूरे यांचा ऑफीसमध्ये मला भेटायला बोलवीले त्यावेळेस ऑफीस मध्ये रनबीर झवेरी, ओम नागपूरे व देवीदास जांगडे उपस्थीत होते. नागपूरे व जांगडे यांनी मला माफी मागीतल व म्हणाले आमच्या हातातून खूप मोठी चुक झालेली आहे आम्ही तुमचे पैसे परत करतो व मला ते दोघे व झवेरी अरविंद सहकारी बँक लि. हिंगणा येथे घेवून गेले व माझे बँक मॅनेजर शी बोलणे करुन दिले. मॅनेजर मला म्हणाले की तुम्ही पॉवर ऑफ अटर्णी रद्द करुन दया. तेव्हाच त्यांचा नावानी लोन होईल. असे सांगण्यात आले व तेथून आम्ही सर्वजन नागपूरे यांचा ऑफीस मध्ये परत आलो. मी विचार करण्यास या तिघांना वेळ मागीतला व तिथून निघून गेलो . त्यानंतर यांचे वारंवार मला फोन येत होते मी पून्हा एकदा यांची भेट घेतली व मला झवेरीनी आश्वासन दिले की तुम्ही पॉवर ऑफ अटर्णी रद्द करा लोन शासंन झालेले आहे व तुमचे पैसे परत घेवून हया मी त्यांचा या प्रलोबनाचा स्विकार केला व दि. १८/११/२०२० रोजी पावर ऑफ अटर्णी रद्द करुन दिली पपावर ऑफ अटर्णी मध्ये दोन्ही साझेदार नागपूरे व जांगडे यांचाच ओळखीने होते पावर ऑफ अटर्णी रद्द करते वेळेस ओम नागपूर यांनी मला ३०,००,०००/- , ३०,००,०००/ – दोन चेक दिले व झवेरीने तोंडी आश्वासन दिले की, आपले पैसे आपल्याला मिळून जाईल. दि. २५/०२/२१ रोजी मला गिट्टीखदान पोलीस स्टेशन, नागपूर येथुन फोन आला व त्यानी मला दि.२५/०२/२१ रोजी गिट्टीखदान पोलीस स्टेशन येथे माझ्याकडील ओरीजनल कागदपत्रे घेवुन बोलविले होते त्याप्रमाणे मी माझा जगदीश देवीदास जांगडे व ओम यशवंत नागपूरे यांच्या सोबत दि. २७/०४/२०१९ रोजी झालेला ओरीजनल लेखी करारनामा घेवुन दि. २५/०२/२१ रोजी गिट्टीखदान पोलस स्टेशन येथे गेलो. त्यावेळेस दिपक लाकडे व वानखेडे मेजर हे हजर होते तसेच या उरोक्त स्थावर मालमत्ते चे मालकानर्फे झवेरी तसेच . जगदीश देवीदास जांगडे व ओम यशवंत नागपूरे हे देखील हजर होते . पोलीसांनी मला माझ्याजवळील जगदीश देवीदास जांगडे व ओम यशवंत नागपूरे यांच्यासोबत झालेला माझा ओरीजनल लेखी करारनामा तपास कामाकरिता मागितला तसेच मला २५/०२/२०२१ रोजीचे सुचनापत्र दिले व मला सांगितले की चार पाच दिवसांनी तुम्हाला हा ओरीजनल करारनामा परत मिळेल तो पर्यंत तो ओरीजनल करारनामा तपासकामी आमच्या ताब्यात राहील व मला तेथुन जाण्यास सांगितले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो ओरीजनल लेखी करारनामा मी पोलीस स्टेशनला तपास अधिकारी यांच्याकडे जमा करून मी तिथुन निघुन गेलो. त्यानंतर मी बरेचदा श्री वानखेडे व दिपक लाकडे यांच्याशी संपर्क साधला व त्यांना आपला ओरीजनल करारनामा परत मागितला परंतु त्यांनी प्रत्येक वेळेस काही ना काही कारण सांगुन माझी टाळाटाळ केली. त्यानंतर मला दिपक लाकडे यांनी सांगितले की, माझी दुसरीकडे बदली झालेली असुन तुम्ही या केसचे तपासी अधिकार सचिन वाकलेकर सरांशी संपर्क करा . याच मधल्या काळात मला दि . ०२/०८/२०२१ रोजीच्या नवभारत पेपर मध्ये उपरोक्त स्थावर मालमत्ता विक्रीबाबत जाहीर सुचना वाचली. त्यानंतर मी वारलेकर सरांशी संपर्क साधला व मी दि . २६/०२/२०२१ रोजी मी जमा केलेला ओरीजनल करारनाम्याची मागणी केली . त्यावेळेस सचिन वाकरलेकर सरांनी माझा ओरीजनल करारनामा मला दाखवीला तो बघुन मला आश्चर्याचा धक्काच बसला. माझा तो ओरीजनल करारनामा पेनानी आडवी रेषा मारून रद्द करण्यात आलेला होता व त्यावर जगदीश देवीदास जांगडे व ओम यशवंत नागपूरे यांच्या सहया होत्या. मी माझा दि. २७/०४/२०१९ रोजीचा जगदीश देवीदास जांगडे व यशवंत नागपूरे यांच्या सोबत झालेली लेखी करारनामा जमा करतेवेळी तो कुठेही रद्द करण्यात आलेला नव्हता . आजही तो विक्रीपत्राचा ओरीजनल करारनामा तपासी अधिकारी सचिन वाकलेकर यांचेकडे जमा आहे. उपोरक्त पोलीसांनी जगदीश देवीदास जांगडे व श्री ओम यशवंत नागपूरे तसेच झवेरीशी संगमत करून मी जमा केलेल्या ओरीजनल लेखी करारनाम्यामध्ये पोलीसांना ओरीजनल लेखी कागदपत्रामध्ये कुठलाही फेरबदल करण्याचा अधिकार नसतांना अनाअधिकृत पणे खोडताड केलेली आहे.ज्यामुळे माझे आर्थिक नुकसान व मानसिक त्रास झालेला आहे. त्यामुळे आपणास नम्र निवेदन आहे की, आपण उपारोक्त पोलीसांवर व त्यामध्ये सहभागी असणाऱ्या लोकावर योग्य कायदेशीर कार्यवाही करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून मला न्याय मिळुन दयावा .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

जिल्हाधिकारी संजय मीणा यांचे नागरिकांना लसीकरणाचे आवाहन

Wed Nov 24 , 2021
गडचिरोली, दि.24, जिमाका : गडचिरोली जिल्ह्यात कोविड लसीकरणाला गती देण्याचे व नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले आहे. जिल्हयातील 11.88 लक्ष लोकसंख्येपैकी 8.35 लक्ष पात्र नागरिकांना कोरोना लसीकरणाचे उद्दिरष्ट ठेवण्यात आले आहे. पैकी लशीचा पहिला डोस 6,14,141 नागरिकांनी घेतला आहे त्याची टक्केवारी 73.55 आहे. तर दुसरा डोस 2,86,022 म्हणजेच 34.25 टक्के लोकांनी घेतला आहे. यामध्ये पहिला डोस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com