संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 24 :- कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी सफेक्स केमिकल्स इंडिया लिमिटेड कडून कामठी येथील ग्रामीण उद्धार सोसायटी द्वारा संचालित सरस्वती उच्च प्राथमिक शाळेला सीएसआर उपक्रम अंतर्गत साउंड सिस्टम भेट देण्यात आले.
याप्रसंगी संजय कृषी केंद्राचे संचालक संजयजी ढोक, सफेक्स केमिकल्सचे एरिया मॅनेजर अभय जिभकाटे, नागपूर जिल्हा प्रतिनिधी संदीप येनूरकर, मुख्याध्यापिका विजया गोतमारे,जयपाल बारसागडे,ज्योती भुजाडे,कल्पना भुजाडे,शंकर भुजाडे,रजनी पडोळे, नमित समुंड्रे,कृष्णा बोडतकर,मालती रेवतकर,नेहा वांढरे,निकिता साखरे,तुषार सहारे,राजु ढोके, लता गाढवे, रेखा खरकाटे,ज्योत्सना इत्यादी उपस्थित होते.
सफेक्स ही कंपनी शेतकऱ्यांबरोबर त्यांच्या मुलाचे हित जोपासण्याचे काम करते.हेमंत डोंगरे यांच्या वर्षभर केलेल्या पाठपुराव्यामुळे शाळेला सदर साउंड सिस्टिम भेट प्राप्त झाली या भेट प्राप्तीमुळे शाळेतील समस्त शिक्षक व विद्यार्थ्यांनी कंपनीचे आभार मानले.