रेड्डीं तर्फे शेतमजुरांना घोंगशी तर जेष्ठांना छत्री ची भेट

रामटेक :- आज दिनांक ६ ऑगस्ट रोज रविवारला माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचे वतीने रामटेक तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांना ऐन पावसाळ्यात उपयोगी पडणाऱ्या घोंगशी तथा जेष्ठ नागरीकांना छत्रीचे वितरण करण्यात आले. यावेळी शेतकरी, शेतमजुरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.           रामटेक परीसरातील शेतात धान रोवनी करित असताना पावसापासून त्यांचे संरक्षण व्हावे करिता अशा गरजुंना धोंगशी वाटप करण्यात आल्या. तर शहरातील जेष्ठ नागरीकांना छत्री भेट म्हणुन देण्यात आली. यावेळी प्रामुख्याने माजी आमदार मल्लिकार्जुनजी रेड्डी, दिलीप देशमुख, संजय मुलमुले,आलोक मानकर ,उमेश पटले, आनंदराव चोपकर, करीम मालाधारी, चंद्रशेखर माकडे ,सरदार शेख, विनायकराव बांते, पद्मा ठेंगरे, फिरोज मालाधारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० लसीकरण मोहीमेचे उदघाटन

Mon Aug 7 , 2023
चंद्रपूर :- जिल्हा परीषद आरोग्य विभाग व चंद्रपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० लसीकरण मोहीमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन दिनांक ७ ऑगस्ट २०२३ रोजी रामनगर येथील मनपा शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅनसन व आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते पार पडले. सदर उद्घाटन सोहळ्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चिंचोळे,जिल्हा आरोग्य अधिकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com