– संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 9 :- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देण्यासाठी आजचा दिवस साजरा करणं गरजेचं आहे.याच गोष्टी ध्यानात ठेऊन पंचायत समिती कामठी अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत वडोदा व भुगांव येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकाम करण्यात आलेल्या महिला कुटुंब प्रमुखांचा सत्कार व गृह प्रवेश करण्यात आला.तसेच महिला कुटुंब प्रमुख यांच्या घरकुलाची नोंद गावानंमुना आठ वर घेऊन त्यांचा सत्कार गट विकास अधिकारी अंशुजा गराटे तसेच. सहायक गट विकास अधिकारी प्रदीप गायगोले यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्या घराचे स्त्री कुटुंब प्रमुख यांच्या हसतेच उदघाटन करण्यात आले. व त्यांना गाव नमुना आठ ची प्रत देण्यात आली.
सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत वडोदा व ग्रामपंचायत भुगांव चे सरपंच वनिता इंगोले, आंबीलडुके , सचिव सांगोळे, फरकाडे , बांधकाम विभागाचे कर्मचारी गजभिये, . आदे, . रत्नाकर तसेच आरोग्य विस्तार अधिकारी मनीष दिघाडे उपस्थित होते.
घरकुल बांधकाम केलेल्या महिला कुटुंब प्रमुखांचा सत्कार
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com