संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नागपूर मार्गावरील भीलगाव परिसरातील ऑरेंज सिटी अलायन्स लोखंड कंपनीत लोखंडी रॉडची कटिंग करत असताना गॅस पाईप लिखीज झालेल्या स्फोटात तरुण कामगार कामठी येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुपारी दोन वाजता सुमारास मृत्यू झाला असून सत्येंद्रकुमार बुद्ध गोड वय 26 राहणार बीसीपुर महरींम ,जिल्हा चांदवली उत्तरप्रदेश असे मृत कामगारांचे नाव आहेत.
नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामठी – नागपूर मार्गावरील भीलगाव परिसरातील ऑरेंज सिटी अलायन्स लोखंड कंपनीत 250 कामगार काम करीत असून सत्येंद्रकुमार बुद्ध गोड वय 26 हा उत्तर प्रदेशातील कामगार असून गेल्या आठ महिन्यापासून या कंपनीत काम करीत होता व कंपनीतच कामगार वसाहत मध्ये राहत होता आज सकाळी आठ वाजताच्या पाळी मध्ये कामावर गेला सकाळी साडेआठ वाजता सुमारास गॅस कटरने लोखंडी रॉडची कटिंग करत असताना ग्यास पाईप लिखिज झाल्याने स्पोट झाला सत्येंद्रकुमार गोंड हा गंभीर जखमी झाला असता त्याला सहकारी कामगाराणी कामठी शहरातील चौधरी हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले होते उपचार सुरू असताना दुपारी दोन वाजता सुमारास त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती नवीन कामठी पोलीस स्टेशनला मिळतात ठाणेदार प्रमोद पोरे यांनी रुग्णालय व ऑरेंज सिटी अलायन्सेस कंपनीत घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली लोखंड कंपनीत 250 कामगार असून दोन पाळ्यांमध्ये काम करीत असतात कंपनीत कोणत्याही प्रकारची कामगाराच्या सुरक्षे विषयी उपाययोजना नसल्याचे काही कामगारांनी दबक्या आवाजात सांगितले ब्लास्ट झाल्यानंतरही कंपनी व्यवस्थापकाकडून प्रकरण दाबण्याचा प्रकरण झाला असल्याचा काही कामगारांनी आरोप केला आहे मृत कामगाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी कामगारांनी केली आहे मृत्तकाचे मागे आई-वडील दोन भाऊ, दोन बहिणी असा मोठा हप्ता परिवार आहे मृतकाचे मामा रोशन पतवारी गुण यांचे तक्रारी व नवीन कामठी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली असून ठाणेदार प्रमोद पोरे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक साबळे पुढील तपास करीत आहेत.