– तक्रारीवरून गुन्हा दाखल
बेला : बाहेरून डाकघराच्या भिंतीशी कचरा पेटवण्यात आल्यामुळे आत मध्ये ठिणगी जाऊन बेला येथील शाखा डाक कार्यालयाला आग लागली. सकाळची वेळ असल्याने दिसताक्षणी आसपासचे नागरिक धावल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र या आगीत डाक घराचा दस्तऐवज व दोन संगणकीय मशीन असा एकूण 65 हजार रुपये किमती च्या मालमत्तेचे नुकसान झाले. डाक लेखापाल देवराव नरड यांनी बेला पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून कचरा जाळणारे दुकानदार व ग्रामपंचायत सदस्य सुनील गावंडे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती फिर्यादीने दिली.
गावंडे यांचे मुख्य रस्त्यावर औषधी व किराण्याचे दुकान आहे. ते आपल्या दुकानाचा केर कचरा ,टाकाऊ खर्डे ,खोके ,प्लास्टिक तरटपट्ट्या, तेलकट पोते व एक्सपायर झालेल्या औषधी बॉटल्स, गोळ्या डाक घरामागील कॉम्प्लेक्स च्या भिंतीशी दररोज नोकरा मार्फत जाळतात व प्रदूषण करतात. नेहमी कचरा जाण्यामुळे भिंतीला छिद्र पडले व त्यातून ही आग लागली असे बोलले जाते. कचरा पेटवल्यानंतर परिसरात धूर पसरतो ,हवेने जाळके ही इकडे तिकडे उडतात. येणाऱ्या जाणाऱ्या व आसपासच्या दुकानदारांना याचा खूप त्रास होतो . अशी तक्रार नागरिक व व्यापाऱ्यांनी बेला ग्रामपंचायत कडे 26 ऑक्टोंबर ला केली होती .परंतु गावंडे ग्रामपंचायत सदस्य असल्याने त्यांच्यावर कारवाई झाली नाही .वेळीच कारवाई झाली असती तर आगीची घटना घडली नसती .असे गावकऱ्यांमध्ये बोलले जाते. यासंदर्भात बेला पोलीस स्टेशनमधून लावण्यात आलेल्या कलमांची माहिती अधिकृतपणे मिळाली नाही.