मुत्रीघर की कचरा घर ? 

-महिलांची कुचंबणा ठीक ठिकाणी घाणीचे साम्राज्य
   बेला : उमरेड तालुक्यातील सर्वात मोठे गाव असणाऱ्या बेला येथील बसस्थानकावर सार्वजनिक मुत्रीघर आहेत .परंतु ते प्रवासी निवारा मागे उकिरड्यावर उरफाटे बांधले आहे . त्यामुळे प्रवासी, नागरिकांसाठी गैरसोयीचे ठरत आहे .प्रसाधनगृहाचे दार उलट्या दिशेने असल्यामुळे विद्यार्थिनी व महिलांना ते दिसतच नाही.परिणामी, त्यांना संकोचाने इतस्ततः भटकावे लागते यात त्यांची कुचंबणा होत आहे.पुरुष दारासमोर दगड-विटा-सिमेंट कॉंग्रेसच्या मलबा टाकण्यात आल्यामुळे नागरिकांना ये-जा करता येत नाही . घाण, सांडपाण्याचा निचरा होत नाही.त्यामुळे उग्र दुर्गंधी येते .त्यामुळे आत येणे जाणे करणे टाळल्या जाते.आवक-जावक नसल्याने तिथे मोकाट व बेवारस कुत्रे बसतात व झोपतात.अशी अवदसा येथे पाहायला मिळते.
  याशिवाय इतर सार्वजनिक वर्दळीचे गुजरी व पोलीस स्टेशन समोरील ाथरूम मध्ये सुद्धा गणिताचे प्रचंड साम्राज्य दिसून येते स्थानिक ग्रामपंचायती  चे याकडे दुर्लक्ष होत आहेत .त्यांचा सफाई कर्मचार्‍यांवर वचक राहिलेला नाही त्यामुळे ही दुरवस्था निर्माण झाली आहे.
सरपंच यांनी लक्ष द्यावे
  बेला पंधरा हजार लोकसंख्येचे मोठे ऐतिहासिक गाव आहे. संत कोलबा स्वामी, बालयोगी रामचंद्र महाराज , मधुबाबा व श्रावण बाबा इत्यादी संतांची ही जन्मभूमी आहे. येथे महिला सरपंच असतानाही बाथरूम साठी महिलांना भटकावे लागते व त्यांची कुचंबणा होते व ठीक ठिकाणी घाणीचे साम्राज्य येथे असावे .हे दुर्दैव आहे. बस स्थानकावरच नव्हे तर आठवडी बाजार, गुजरी ,वडगाव चौक व पो स्टे समोरील बसस्थानकावर सुद्धा उत्कृष्ट स्वच्छतागृह असावे .यासाठी सरपंच यांनी लक्ष द्यावे
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

उंटखाना येथे महापरीनिर्वाण दिनानिमित्त डॉ.आंबेडकर यांना अभिवादन

Mon Dec 6 , 2021
  नागपूर –   प.पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ६५ व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त प. पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध संयुक्त जयंती समिती, उंटखाना, नागपूर तर्फे पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर डॉ. आंबेडकर यांना दोन मिनिट स्तब्ध राहून आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला संजय आंभोरे, राजेंद्र साठे,सहदेव भगत,चंदु खोब्रागडे,सुजाता सुके,चेतन गणवीर, शकुंनबाई सुके, बेबीनंदा खोब्रागडे, न्यायाबिंदू ताकासांडे, अनुसया […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com