नागपूर :- डॉ. रविंद्रकुमार सिंघल पोलीस आयुक्त नागपुर शहर, यांचे संकल्पनेतुन पोलीसांना अति व्यस्ततेतुन कुटुंबीयासह आनंद घेता यावा करीता नवरात्रीचे औचीत्य साधुन पोलीस व त्यांचे कुटुंबीयांना विरंगुळा घेण्यासाठी नागपुर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे दिनांक ०९.१०.२०२४ रोजी सायंकाळी ०७.०० ते १०.०० वा. पर्यंत पोलीस मुख्यालय नागपुर शहर येथे गरवा रात्रीचे आयोजन करण्यात आलेले होते.
पोलीस आयुक्त यांनी दिपज्योत प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. मा. पोलीस आयुक्त यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच महीला अधिकारी व अंमलदार व त्यांचे कुटुंबीयांना नवरात्रीच्या शुभेच्छा देवुन कुटुंबीयासह गरबा नृत्य करून आनंद घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, यांनी सुध्दा सर्व पोलीस अधिकारी तसेच अमंलदार व त्यांचे कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या. संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, यांनी सुध्दा उपस्थीतांना नवरात्रीच्या शुभेच्छा देवुन गरबा नृत्यात सहभाग घेण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी विशेष करून वरिष्ठ महीला पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच त्यांचे कुटुंबातील सदस्य मुले व मुली हे गरवा नृत्याच्या पारंपारीक वेषभुषेत हजारोंच्या संख्येने सहभाग घेतला. सर्वांनी कार्यक्रमादरम्यान नृत्याचा व गरब्याचा आनंद घेवून मा. पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेचे स्वागत करून मनोमन आभार व्यक्त केले.