संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 29 :- देवाधिदेव श्री गणरायाचे आगमन अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपलेले आहे.त्यामुळे यावर्षी निर्बंध उठल्याने गणेश भक्तांनी बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू केली आहे.
गणेशोत्सव सार्वजनिक मंडळाच्या वतीने गणेशभक्त मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करीत असले तरी नवसाला पावणारा भगवान गणेश असल्याने काही गणेशभक्त घरगुती गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करतात.त्यामुळे गणेश भक्तात यावर्षी मोठा उत्साह संचारला आहे.
गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जाणार असून या उत्सवा निमित्त बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी कामठी तालुक्यात सुरू झाली आहे.यावर्षीचा गणेशोत्सव हा सार्वजनिक स्वरूपा बरोबरच खासगिरीत्या घराघरातही मोठ्या उताहात व भव्यतेने साजरा केला जाणार असल्याने गणेश भक्तात आतपासूनच उत्साह संचारला आहे .येत्या 31 ऑगस्ट रोजी बाप्पांचे धुमधडाक्यात आगमन होणार असून दहा दिवसांत मुक्कामी राहणाऱ्या बाप्पांच्या मूर्तीची स्थापना भाविक भक्तातर्फे 31 ऑगस्ट ला मोठ्या उत्साहात केला जाणार असताना यावर्षीचा गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात व लोकहीत उपयोगी कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यासाठी युवावर्ग हा पुढाकार घेत आहे.