गांधी जयंती : मुंबई ते देहरादून पर्यावरण सायकल यात्रेला राज्यपाल दाखवणार हिरवी झेंडी

मुंबई :- ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ पद्मभूषण डॉ.अनिल जोशी यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीच्या दिवशी आर्थिक राजधानी मुंबई ते पर्यावरण राजधानी उत्तराखंड या ८ दिवसांच्या सायकल यात्रेला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी राजभवन मुंबई येथून हिरवी झंडी दाखवून रवाना करणार आहेत.

आर्थिक विकासासोबत निसर्गाचा समतोल राखला जावा तसेच सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) ऐवजी सकल पर्यावरण उत्पादन (GEP) हा विकासाचा आधार मानला जावा, या हेतूने ही सायकल यात्रा काढली जाणार आहे. ही यात्रा अंदाजे 2 हजार किमी अंतर पार करताना 7 राज्यांमधून जाणार असून 60 लहान मोठ्या शहरांमधून तसेच एक हजार गावांमधून जाणार असल्याचे आयोजक डॉ अनिल जोशी यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पशुपक्षी यांचा जीव वाचविण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Sat Oct 1 , 2022
पशु पक्ष्यांच्या उपचारासाठी 11 अॅम्बुलन्सचे लोकार्पण मुंबई :- निसर्गचक्रात पृथ्वीवरील सर्व सजीवांची काळजी घेतली तरच मानवी जीवन सुखी होवू शकते, यासाठी पशुपक्षी यांचा जीव वाचविण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. राजभवनातील दरबार हॉल येथे समस्त महाजन संघटनेच्यावतीने मुंबई शहरातील पशु पक्ष्यांच्या उपचारासाठी 11 अॅम्बुलन्स लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरूषोत्तम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com