राजभवन येथील गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन; राज्यपालांकडून बाप्पाला निरोप

मुंबई :- राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या निवासस्थानी, राजभवन येथे स्थापन केलेल्या गणरायाचे बुधवारी (दि. ११) गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी राजभवन येथे कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.

राज्यपालांनी कुटुंबातील सदस्य तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांचेसह गणरायाची आरती केल्यानंतर बाप्पाला निरोप दिला.

राज्यपालांच्या सूचनेनुसार गणेश मूर्तीचे समुद्रात विसर्जन न करता कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.

गणेशमूर्ती विसर्जन करताना पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी मूर्तीचे समुद्रात विसर्जन न करता ते कृत्रिम हौदात करावे अशी सूचना राज्यपालांनी केल्यामुळे मूर्तीचे विसर्जन हौदात करण्यात आले.

शाडूची मूर्ती; नाशिक मध्यवर्ती कैद्यांनी केली निर्मिती

राज्यपालांच्या निवासस्थानी मांडलेली गणेशाची मूर्ती शाडूची होती व ही मूर्ती नाशिक येथील कारागृहातील कैद्यांनी तयार केली होती.

विसर्जनाचे वेळी राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे, सहसचिव श्वेता सिंघल, परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

5 व्या दिवशी 2942 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन

Thu Sep 12 , 2024
नागपूर :- नागपूर महानगरपालिकातर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी कृत्रिम हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात घनकचरा व्यवस्थान विभागातर्फे संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. डॉ. गजेन्द्र महल्ले, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग यांनी सांगितले की, पांचव्या दिवशी 2942 श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन विविध ठिकाणी करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!