– नागपुर ते श्रीक्षेत्र रामटेक पायी पालखी दिंडी यात्रा दि.३ ते ६ जानेवारी २०२५
कन्हान :- श्री संत गजानन महाराज सेवा समिती, तीन खंबा चैक नागपुर व्दारे अठराव्या वर्षी संत गजानन महाराज पायी पालखी दिंडी यात्रेचे आयोजन करून शुक्रवार (दि.३) जानेवारी ला सायंकाळी कन्हान शहरात आगमन होताच मॉ काली माता सेवा ट्रस्ट सत्रापुर कन्हान व्दारे भव्य स्वागत करून, किर्तन व नंतर महाप्रसाद आणि मुक्काम करण्यात येईल.
॥ गण गण गणात बोते ॥ ओम नमो भगवते गजाननाय ॥ श्री राम जय राम जय जय राम ॥
श्री सद्गगुरू गजानन बाबांचे वास्तव्य नागपुर शहरात गोपाळ बुटी यांचे वाडयात असतांना श्री भक्त हरी कुकाजी पाटील त्यांना परत नेण्याकरिता आले व (दि.५) जानेवारी १९०९ ला सद्गगुरू गजानन बाबा सोबत ते रामटेकला गेले. त्याकाळी प्रत्यक्ष रामभक्त शंकरबुवा रामटेक गड़मंदिरवर प्रभु श्रीरामां च्या प्रत्यक्ष दर्शनासाठी जप करित होते. त्यांचे नित्य नेम प्रभु रामाच्या नामाचा जप व गडमंदीर परिसराची साफ सफाई हे कार्य करताकरता १२ वर्षाचा कालावधी झालेला होता.
श्री गजानन बाबा गडावर पोहोचले व त्यावेळेस शंकरबुवा हाती झाडु घेऊन मुखाने श्रीरामाचा जप करित आनंदाने स्वच्छतेचे कार्य करित होते. त्यांनी पाहिले कि, कोदंडधारी वनवासी जटाजूट असलेले श्रीराम साक्षात गडावर येत आहेत. त्यांच्या हाताचा झाडु जमिनीवर पडला व ते प्रभु रामाच्या पायावर लोटले. आपल्या नेत्रातील अश्रुधारेंनी प्रभुंचे पायाचा अभिषेक केला व परत उठुन पाहिले तर समोर गजानन बाबा दिगंबर अवस्थेमध्ये दिसले. परत डोळे मिटुन उघडले तो साक्षात पितांबरधारी श्रीराम उभे हा भक्त व भगवंत यांच्या भेटीचा सोहळा बराच वेळ चालला. सद्गुरू गजानन बाबांनी शंकरबुवांना घट्ट आलिंगन दिले व आशीर्वाद दिला. हा प्रसंग म्हण जे ‘जीव आणि शिव’ यांची एकात्मता याचे साक्षात उदाहरण आहे. या प्रसंगाची आठवण प्रत्येक भक्ताला व्हावी. या निमित्य ‘श्री’ ची छोटीशी सेवा म्हणुन (दि.३) जानेवारी २०२५ ला श्री संत गजानन महाराजां ची पालखी यात्रा टिमकी, तीनखंबा चौक नागपुर श्री हरिहर गजानन निवास येथुन प्रस्थान होऊन (दि.५) जानेवारी २०२५ रोजी श्रीक्षेत्र रामटेक येथे आगमन व (दि.६) जानेवारी २०२५ ला गोपालकाल्याचे कीर्तन व समापन होऊन पालखी यात्रा परत होईल.
मॉ काली माता मंदीर सत्रापुर-कन्हान येथे भव्य स्वागत व मुक्काम.
शुक्रवार (दि.३) जानेवारी २०२५ पहाटे सकाळी ५ वाजता श्रीं ची आरती, श्री हरिहर गजानन निवास, टिमकी, तीन खंबा चौक, नागपुर येथुन सकाळी ५. १५ वा. संत गजानन महाराज पायी पालखी दिंडी यात्रेचे प्रस्थान होऊन श्री गजानन महाराज मंदिर प्रेमनगर येथे सकाळी ८ वा. श्री भवानी माता मंदीर कळमना येथे सकाळी १०.४० वा. फराळ पाणी, दु. १२.३० वा. कामठी येथे आगमन, मिरवणुक, दु. २.३० वा कामठी , मोदी राम मंदीर येथे श्री भक्त कामठी वासियां व्दारे दुपारचे जेवण तदंतर प्रवचन व अल्प विश्रांती, सायं. ५.४५ वा. काली माता मंदीर येथे पालखीचे आगमन होताच मॉ काली माता मंदीर सेवा ट्रस्ट, सत्रापुर कन्हान व्दारे भव्य स्वागत व सायं. ७ ते ८.३० किर्तन व नंतर महाप्रसाद आणि मुक्काम. शनिवार (दि.४) जानेवारी ला सकाळी ६.३० वा पालखी प्रस्थान, राष्ट्रीय महामार्गाने गणेशनगर, श्री हनुमान, गजानन मंदीर तीवाडे ले-आऊट येथुन पांधन रोडने कन्हान नगर प्रदक्षिणा करित स. ७.३० वा. श्री काकडे निवास येथे चाय नास्ता व विसावा, शितला माता मंदीर जे एन रोड येथे स्वागत नंतर कांद्री गाव प्रदक्षिणा करून जे एन दवाखाना चौक ते बोरडा – नगरधन मार्गे रामटेक कडे मार्गक्रमण करेल. या पालखी यात्रेत आपण सहभागी होऊन श्री गजानन महाराजांचे सोबत प्रभु श्रीरामचंद्रांचे दर्शनाचा लाभ घेऊन या मंगल प्रसंगी आठवण साकार करावी असे आवाहन मॉ काली माता मंदीर ट्रस्ट चे व्यवस्थापक उत्तमराव दुरूगकर हयानी केले आहे.