‘गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन प्रोजेक्ट उडान अंतर्गत “रोजगार मेळाव्याचे” आयोजन

गडचिरोली :- गडचिरोली जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगार युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दल पोलीस दादालोर खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दल व पार्कसन्स स्किल सेंटर, नागपुर आणि मेहदा शिक्षण बहुद्देशीय संस्था नागपुर व एसआयएस, चंद्रपुर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२/०६/२०२३ रोजी “रोजगार मेळावा” पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य हॉल येथे पार पडला.

या रोजगार मेळाव्यात दुर्गम अतिदुर्गम भागातील २०० बेरोजगार युवक-युवती नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित उमेदवारांमधुन पार्कसन्स स्किल सेंटर, नागपुर यांचे मार्फतीने हॉटेल मॅनेजमेंट, नर्सिंग असिस्टेट व सुरक्षा रक्षक म्हणून उमेदवारांना रोजगाराची संधी मिळणार आहे. तसेच पुणे व हैद्राबाद येथे नर्सिंग असिस्टट प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ३५ युवतींना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. व्याव्यास उपस्थित युवक-युवतींना मार्गदर्शन करतांना अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांनी सांगीतले की, पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यात येतात, त्याचा सर्वांनी फायदा करून घ्यावा. आपले व आपल्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावावे, तसेच अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे यांनी आपले भाषणात सांगितले की, गडचिरोली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल कराये, मेहनत करून जास्तीत जास्त यशस्वी व्हावे. गडचिरोली पोलीस दल नेहमीच तुमच्या पाठीशी आहे, तुमचे नातलग, मित्र मैत्रीणीना जे बेरोजगार आहेत त्यांना देखील रोजगार बाबत अवगत करावे. असे आपल्या मनोगतात व्यक्त केले,

सदर रोजगार मेळावा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच हेमंत बन्सोड, मोबलायझेशन अॅन्ड प्लेसमेंट हेड पार्कसन्स स्किल इस्टीट्यूट, नागपूर, सुपार मेधान संस्था प्रमुख मेहमुदा शिक्षण बहुदेशीय संस्था नागपुर व मुकेश पाटणे एमआयएस, चंद्रपूर यांच्या उपस्थितीत पार पडला.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे उपपोस्टे व पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी धनंजय पाटील व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पुलक मंच परिवार ने किया योग दिवस का आयोजन

Thu Jun 22 , 2023
नागपुर :- अखिल भारतीय पुलक मंच परिवार शाखा महावीर वार्ड नागपुर द्वारा नम्ह्या फाउंडेशन, श्री महावीर सहकारी गृहनिर्माण संस्था के सहयोग से विश्व योग दिवस पर योगासन का आयोजन महावीरनगर मैदान पर बुधवार को किया गया. अंतर्राष्ट्रीय योगगुरु मंगला पाटिल, छकूली सेलोकर ने योगासन के प्रत्याक्षिक कर के दिखाए. डॉ. नरेंद्र भुसारी ने ध्यान के सूत्र, प्रत्याक्षिक कर दिखाए. उपस्थित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com