12 व्या अखिल भारतीय पोलीस तिरंदाजी स्पर्धेत गडचिरोली पोलीस दलाच्या अधिका­ऱ्याने पटकावले कांस्य पदक

– पोस्टे आरमोरी येथे कार्यरत असलेले पोउपनि सुरज अनपट यांची यशस्वी कामगिरी

गडचिरोली :- जिल्हा माओवाददृष्टया अतिसंवेदनशिल जिल्हा असून गडचिरोली पोलीस दलातील पोलीस जवान हे या दुर्गम-अतिदुर्गम भागात आपली सेवा बजावत विविध कलागुण जोपासत असतात दि. 30 जोनवारी ते 04 फेब्राुवारी 2024 दरम्यान बँगलोर (कर्नाटक) येथे पार पडलेल्या 12 व्या अखिल भारतीय पोलीस तिरंदाजी स्पर्धेत गडचिरोली पोलीस दलातील पोस्टे आरमोरी येथील कार्यरत असलेल्या पोउपनि सुरज सुनिल अनपट यांनी इंडियन राउंड प्रकारात महाराष्ट्र पोलीस संघाचे नेतृत्व करत कांस्य पदक प्राप्त केले. कांस्य पदकासाठी महाराष्ट्र पोलीस संघाने आयटीबीपी संघाचा 6-4 अशा फरकानेे पराभव केला.

पोउपनि सुरज अनपट यांच्या या यशस्वी कामगिरी करिता  पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. यावेळी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी  एम. रमेश यांनी देखील पोउपनि सुरज अनपट यांना शुभेच्छा दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपुर मेट्रो का १० वा स्थापना दिवस; 2025 तक 8 किलोमीटर मार्ग पर मेट्रो ट्रेन चलाने का मानस - श्रावण हार्डिकर

Thu Feb 22 , 2024
नागपुर :- नागपुर मेट्रो की 10 वीं वर्षगांठ आज मेट्रो भवन में मनाई गई। नागपुर मेट्रो के स्थापना दिवस के उपलक्ष्य मे महा मेट्रो द्वारा कई खेलों का आयोजन किया गया था । इस दौरान सभी खिलाड़ियों को पुरस्कार तथा मेट्रो कर्मचारियों को प्रबंध निदेशक श्रावण हर्डीकर द्वारा पुरस्कार प्रदान किए गए । इस अवसर पर महा मेट्रो के निदेशक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com