भूसंपादन मावेजासाठी निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– जामनेर मतदारसंघातील तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत अधिग्रहीत जमिनींच्या भूसंपादन मावेजा संदर्भात बैठक

मुंबई :- जामनेर मतदारसंघातील तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत जलसंपदा प्रकल्पांकरीता अधिग्रहीत जमिनींच्या भूसंपादन मावेजासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे जामनेर मतदारसंघातील तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत जलसंपदा प्रकल्पांकरीता अधिग्रहीत केलेल्या जमिनींचे भूसंपादन संदर्भातील बैठक झाली.

यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,आमदार मंगेश चव्हाण, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.

उपलब्ध निधीतून मावेजा प्राधान्याने अदा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

पुरवणी मागण्यांद्वारे यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आवर्जून सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

37 वें राष्ट्रीय खेल - महाराष्ट्र का ऐतिहासिक दोहरा शतक!

Wed Nov 8 , 2023
पणजी :- ‘अबकी बार 200 पार’ के संकल्प के साथ महाराष्ट्र के एथलीटों ने 37वें राष्ट्रीय खेलों में शानदार प्रदर्शन करते हुए पदकों का ऐतिहासिक दोहरा शतक लगाया. महाराष्ट्र के युवा खिलडियो के गौरवपूर्ण प्रदर्शन से पूरे देश में राज्य का गौरव बढ़ा है।राष्ट्रीय खेल खेलों के 13वें दिन मंगलवार को मुख्य रूप से ट्रायथलॉन, कबड्डी, कयाकिंग में पदक जीते […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!