अल्पसंख्यांक बहुल योजनेतून मोर्शी मतदार संघांमध्ये 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर ! 

– आमदार देवेंद्र भुयार यांचे नागरिकांनी मानले आभार !

मोर्शी :- मोर्शी वरूड तालुक्यात असलेल्या अल्पसंख्याकबहुल असलेल्या नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, अल्पसंख्याक वस्त्यांचा विकास व्हावा आणि त्या ठिकाणी राहणार्‍या नागरिकांचे जीवनमान उंचावे यासाठी मोर्शी वरूड तालुक्यातील १५ अल्पसंख्याकबहुल ग्रामपंचायतीला प्रत्येकी २० लाखांचा निधी आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नाने विशेष बाब म्हणून मंजूर झाल्याने मोर्शी वरूड तालुक्यातील जवळपास १५ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या अल्पसंख्याकबहुल वस्त्यांचा ३ कोटी रुपयांच्या विकासकामातून आता विकास होणार आहे.

अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्यांक लोकसमूहातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाने अल्पसंख्यांक बहुल योजना आमदार देवेंद्र भुयार यांनी राबवली आहे.

त्या योजनेला सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मोर्शी विधानसभा मतदारसंघांमध्ये या योजनेतून विविध विकास कामासाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली आहे.

वरुड व मोर्शी तालुक्यातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकास कामांना प्रशासकीय मान्यताआमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नाने मिळाली असून येथे शादिखाना / कब्रस्तान / ईदगाह येथे टिनशेड बांधकाम व इतर अनुषंगिक कामे करणे केल्या जाणार असून गव्हाणकुंड 20 लक्ष रुपये, रिद्धपूर 20 लक्ष रुपये, पुसला 20 लक्ष रुपये, बेनोडा, 20 लक्ष रुपये, आमनेर 20 लक्ष रुपये, पिंपळखुटा मोठा 20 लक्ष रुपये, जरुड 20 लक्ष रुपये, कुरळी 20 लक्ष रुपये, शहापूर 20 लक्ष रुपये

मांगरुळी 20 लक्ष रुपये, वघाळ 20 लक्ष रुपये, लोणी 20 लक्ष रुपये, हिवरखेड , 20 लक्ष रुपये, अंबाडा 20 लक्ष रुपये, खेड 20 लक्ष रुपये या सर्व विकास कामांसाठी 3 कोटी रुपयांचा निधी आमदार देवेंद्र भुयार यांनी मंजूर करून दिल्याबद्दल संपूर्ण गावातील नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.

आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नाने मोर्शी विधानसभा क्षेत्रातील अल्पसंख्याक लोकसमुहातील नागरिकांच्या विकास कामां करीता तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आपल्या विधानसभा क्षेत्रातील सर्व समुदायातील नागरिकांनानागरी सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरिता आमदार देवेंद्र भुयार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

अभ्यासू व चाणक्य बुद्धिमत्तेमुळे मतदार संघामध्ये ४ हजार ३७२ कोटींचा निधी. 

अनेकांना ज्या योजना माहिती नाहीत त्या योजने मधून आमदार देवेंद्र भुयार यांनी प्रत्येक ठिकाणी भरघोस निधी दिला आहे त्यांच्या अभ्यासू व चाणक्य बुद्धिमत्तेमुळे मोर्शी वरूड मतदार संघामध्ये ४ हजार ३७२ कोटी रुपयांचा निधी आला असून विकास काय असतो हे त्यांच्या विकास कामातून दिसून येत आहे.

– रुपेश वाळके तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस मोर्शी तालुका .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे पुणे संघाला अजिंक्यपद

Mon Oct 7 , 2024
– 17 वर्षाखालील शालेय स्पर्धेमध्ये मुले व मुली गटाचे अजिंक्यपद नागपूर :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर व नागपूर जिल्हा व्हॉलीबॉल संघटना यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान आयोजित 17 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये पुणे विभागाने मुले व मुलींच्या दोन्ही गटाचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com