दरोडा गुन्हयातील फरार आरोपी गजाआड

नागपूर :- पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण यांचे आदेशान्वये संपुर्ण जिल्हयात पाहिजे असलेले आरोपी यांची मोहीम सुरू असतांना मार्गदर्शनात सावनेर उपविभागात पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेत असतांना गोपनीय बातमीदारांकडुन माहिती मिळाली की पो.स्टे कळमेश्वर येथील अप क्र २२४/१२ कलम ३९५ भा.द.वी. मधील पाहिजे. असलेला आरोपी राजेश उर्फ मामा व हरीचंद्र टेकाम, वय ४५ वर्ष, रा. चनकापूर ता. सावनेर जि. नागपूर हा त्याचे राहते घराजवळ चनकापूर (खापरखेडा) येथे राहत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर आरोपीचा शोध घेतला. असता सदर आरोपी हा राहते घराजवळ चनकापूर (खापरखेडा) येथे मिळुन आला. सदर आरोपीस विश्वासात घेवून विचारपुस केली असता सदर आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यावरून सदर गुन्हयात आरोपीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याची वैदकीय तपासणी करून पुढील कार्यवाही करिता पोस्टे कळमेश्वर यांच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक डॉ. मंदिप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक  ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक अनील राऊत, पोलीस हवालदार विनोद काळे, नाना राऊत, ईकबाल शेख, पोलीस नायक वीरू नरड, प्रमोद भोयर, पोलीस शिपाई अभिषेक देशमुख, चालक मोनू शुक्ला यांचे पथकाने केली..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बुट्टीबोरी येथे तेल सदृश्य मुद्देमालाची वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई

Tue Jul 18 , 2023
बुट्टीबोरी :- कोविंग ऑपरेशन दरम्यान पोलीस ठाणे बुट्टीबोरी हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदाराने खात्रीशीर खबर दिली कि. ०१ इसम टाटा इंडिका वाहन के MH ३१ / CP ५८२२ ने स्वतः जवळ चोरीचा मुद्देमाल तेल सदृश्य मुद्देमालाची वाहतूक करीत आहे. अशा प्राप्त खबरेची शहानिशा करणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने नमुद घटनास्थळी नाकाबंदी सुरु केली असता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com