इंधन दर वाढीविरुद्ध भोंगा आन्दोलण
पेट्रोल-डिझेल व गॅस भाववाढ विरोधात आप ने काढला भोंगा मार्च
गुरुवार दि.२१/०४/२०२२ – विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे व राज्य कोषाध्यक्ष जगदीश सिंग यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. यावेळी प्रामुख्याने राष्ट्रीय परिषद सदस्य अमृत सावरकर, राज्य सहसचिव अशोक मिश्रा, नागपुर संयोजिका कविता सिंगल, नागपूर संघटन मंत्री शंकर इंगोले, नागपूर सचिव भूषण ढाकुलकर, नागपूर उपाध्यक्ष डॉ.शहीदअली जाफरी व राकेश उराडे विधानसभा संयोजक रोषण डोंगरे, मनोज डफरे, लक्ष्मीकांत दांडेकर, अजय धर्मे, आकाश कावळे, नामदेव कामडी उपस्थित होते.
आपणास महितच आहे की पाच राज्याच्या निवडणुका पार पडल्याबरोबर देशात पेट्रोल, डिझेल व गैस सिलेंडर च्या कीमती प्रचण्ड प्रमाणात वाढविल्यात. जेंव्हा की मोदी सरकार म्हणते पेट्रोल-डीझेल भाववाढ आमच्या हातात नसून आंतर-राष्ट्रीय बाजारातील क्रुडऑइलच्या भावावर आधारित आहे. असे असतांना पाच राज्याच्या निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार कडून पेट्रोलचे रेट @१०/ कमी करणे आणि पूर्ण निवडणूक होईपर्यंत इंधन दर वाढ न होणे, परंतु निवडणुका पार पडल्याबरोबर @१००/ रुपयाचे पेट्रोल चे दर १०-१२ दिवसात १२०/ पर्यंत वाढविणे म्हणजे काय?
इंधनाच्या वाढलेल्या किंमतीमधील मोठा भाग हा केंद्र व राज्य सरकार नी आकारलेल्या करांचा आहे. डिझेलवर जवळपास ९०% व पेट्रोल वर जवळपास ११० % सरकारी कर लादले आहेत. आपल्या देशात इंधनाच्या किमती ह्या जगात सगळ्यात जास्ती आहेत. रुपयाच्या ‘क्रयशक्ती समता इंडेक्स’ ज्याला इंग्रजीत ‘परचेस पावर पॅरिटि’ म्हणतात, यानुसार जगात सगळ्यात महाग इंधन आपल्या देशात मिळते.
एकूणच जेंव्हा इंधन दर वाढ होते तेव्हां दळणवळण महागते आणि त्यामुळे बाजारातील सर्वच वस्तुचे भाव वाढ म्हणजे महागाई वाढते, जीवनावश्यक वस्तू औषधी पासून मिठा पर्यंत हे महाग झाले आहेत. मध्यम वर्ग व आर्थिक दृष्ट्या कमजोर वर्गाची परिस्थिती कोरोना व लॉकडाऊन मुळे खालावलेली आहे. ज्याचे चटके केवळ गरीब आणि मध्यम वर्गीय लोकांना सहन करावे लागतात.
सन २०१४ पूर्वी पेट्रोल-डीझेल च्या भावात २०-२५ पैसे वाढले तरी बीजेपी रस्त्यावर आन्दोलण करायची, परंतु आता ते सत्तेवर आल्यापासून दररोज भाव वाढ होते, जेंव्हा की १० वर्षांपूर्वी पेक्षा आता क्रूड ओईल चे भाव कमी झाले आहेत. मधल्या काळात तर अगदी खालच्या स्तरावर म्हणजे ३०-३५ डॉलर @ बॅरल पर्यंत क्रुडऑइलचे दर घसरले होते, तरीही भारतात पेट्रोल-डीझेल चे भाव त्याप्रमाणात कमी करण्यात आले नाहीत. याचा कुठेतरी विरोध व्हायला पहिजे म्हणून आज आम आदमी पार्टी कडून संपूर्ण विदर्भात महागाई विरोधात भोंगा आंदोलन करण्यात येत आहे. जेणे करून मोदी सरकार ला गोरगरीब जनतेचा आवाज पोहचेल.
आज प्रामुख्याने, प्लेकार्ड च्या माध्यमातून पेट्रोल-डीझेल च्या मूळ किमतीवर केंद्र व राज्य सरकार किती कर आकारणी करीत आहे, याचे आकडे, तसेच २०१४ पूर्वी मोदीजी जे इंधन दर वाढ विरोधात भाषण देत होते तसेच निवडणुकी नंतर सुद्धा पेट्रोल-डीझेल चे भाव कमी झालेत की नाही असे भाषणबाजी करीत होते त्या भाषणाच्या क्लिप भोंग्यावरून वाजविण्यात आल्यात. तर , महागाई व सरकार विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. काही ठिकाणी महँगाईचे चॉकलेट वाटप करण्यात आलेत.
मा मोदिजींना पेट्रोल-डीझेल ला केंव्हा GST मध्ये आणणार हा ही प्रश्न करण्यात आला आहे. कारण जो पर्यंत GST मध्ये आणले जाणार नाही तो पर्यंत केंद्र आणि राज्य सरकार जनतेची लुट करीत राहील, यामध्ये कुठेही शंका नाही. त्यामुळे इंधन दर वाढीबाबत आता मोदिजी का बोलत नाहीत, स्मृती इराणी का आंदोलन करीत नाहीत, मोदिजी महागाईवर आपण बुलडोजर का चालवीत नाही, हेही प्रश्न आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेत. सरकारने हा लोकांवर लादलेला अन्यायकारक कर त्वरित मागे घ्यावा व वाढलेल्या इंधनाच्या किमती कमी करून लोकांना दिलासा देण्यात यावी अशी आम आदमी पार्टीची मागणी आहे.
ह्या कार्यक्रमाला विजय नंदनवार, योगेश पराते, नरेश देशमुख, हिमांशू तांबे, विकास घरडे, जगदीश रोकडे, माणशिंग अहिरवार गुणवंत सोमकुंवर, पंकज मिश्रा, सौरभ दुबे, अमेय नारनवरे, नरेश महाजन, रोशन डोंगरे, मोरेश्वर मौदेकर
शैलेश गजभिये, प्रदिप पौनिकर, अर्चना राले, कविता उके, जोसना लोणारे, कविता सिंग, अर्चना तांबे, विल्सन लेओनार्ड, सुनील म्याथु, विशाल वैद्य, संजय चांदेकर, किसन निमजे, पंकज मेश्राम, निखील मेंढवाडे,सचिन पारधी,अमोल मुडे,संजय अनासाने,अर्चना शेमबेकर,रवींद्र भिसिकर,सुभाष भगत, उमाकांत बनसोड,डॉ मेघा वाकोडे,विजय मारोडकर, शुभम पराळे,राजू देशमुख,संजय जीवतोडे,प्रणित कडू,विजय तांदुळकर,दुर्योधन ममिडवार,मनोज इंगोले, अजय धर्मे, संतोष वैद्य, सुरेश खर्चे, प्रमोद नाईक, समीर पोतदार, दिलीप बिडक, भारत जवादे, हेमंत भुजाड़े, सचिन लोनकर, प्रतीक चेडकाले, दिलीप चोखआंद्रे, अनिल खंडागले, प्रशांत मेश्राम, सुभाष भगत, रतनदीप तभाने अशीस भालेराव, नितिन गोसावी, गणेश इंगोले, प्रफुल वेवटकर, विवेक वाडे, रविन्द्र वासनिक, शिरीष तिडके, कुंदन कानफड़े, मुकेश शेलारे, बंदूजी अंबुदारे, प्रवीण चौधरी, प्रभाकर आवरी, गौतम कावरे, प्रशांत मेश्राम, अनिल खंडागले, संजय भलमे, अंकुर ढोने, भाग्यश्री ढोनेर, भारत जवादे, हेमंत भुजाड़ेप्रतिक बवंकर, हेमंत पांडे, अभय भोयर, धीरज आगाशे, कुंदन भीमटे, प्रकाश जवादे, शालिनी अरोरा,आकाश कावळे, राहुल कावळे,जॉय बांगडकर,अलका पोपटकर दया भाई, विवेक चापले, अभिजीत झा, प्रकाश तिवारी, आकाश वैद्य, बनसोड काका ,संजय लेंढारे,विश्वजीत भाई, नॉर्थ नागपूर, विकास घरडे, विजय नंदनवार, कविता सिंह, तरूना चाहांदे, अर्चना राले, योगेश पराते, नरेश देशमुख, पंकज मिश्रा , वरुन ठाकूर, जगदीश रोकडे, प्रणाली साहारे, माणशिंग अहिरवार, हिमांशू तांबे, पंकज मेश्राम, विल्सन लेओनार्ड, सुनील म्याथु, स्वप्निल सोमकुवर, विशाल वैद्य, सौरभ दुबे, अमेय नारनवरे, मोरेश्वर मौदेकर, शैलेश गजभिये, कविता उके, जोसना लोणारे, अविनाश लांजेवार, मंगेश डोंगरे, किसन निमजे अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.