डंम्पीग यार्ड च्या धुरा मुळे श्वसना चे विकार मानव निर्मित आगीनां आळा घाला, नागरिकांचे मुख्याधिकाऱ्याना निवेदन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-प्रभाग 15 तील आजनी-कामठी मार्गा वरील नगर परिषदेच्या डंपिंग यार्ड मधील मानव निर्मित आगीच्या धुरामुळे गौतम नगर,सुदर्शन नगर,सैलाब नगर,समता नगर परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून श्वसनाचे आजार जडल्याने नागरिकांनी डंपिंग यार्ड मधील मानव निर्मित आगीना आळा लावण्याची मागणी मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना निवेदना द्वारे केली आहे.

नगर परिषदद्वारे नेमलेल्या कंत्राटदारद्वारा डंपिंग यार्ड मधे शहरातील कचरा आणल्या जातो हा कचरा ओला सुका असा विलग न करता यार्ड मधे टाकल्या जातो जागा अपुरी असल्यामुळे घनकचरा मोठ्या प्रमाणात जमा होतो कंत्राटदार पैसे वाचविण्यासाठी ओला सुका कचरा विलग न करता दिवसा ढवळ्या आग लावतो परिणामी कचऱ्याचा जीवघेणा धुर परिसरात पसरतो व नागरिकाना श्वसनाचे आजार होतात असा नागरिकांचा आरोप आहे.

भाजपा कामठी शहर महामंत्री उज्वल रायबोले यांच्या नेतृत्वात येथील नागरिकांनी डंपिंग यार्ड विरोधात निवेदन मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना देऊन मानव निर्मित आगीवर प्रतिबंध लावण्याची मागणी केली.

निवेदनावर मोहम्मद जुलकर नैन, मोहम्मद शादाब, शेख शब्बीर, अमानउल्ला खान,संकेत झोडापे, कुणाल गजबे,रोहन देशभ्रतार,दीपांक श्यामकुंवर, शैलेश डांगे,पियूष पिल्लेवान, राकेश मेथिया, ओम बरोंडे, बबलू मधुमटके, शिवम मेथिया, पूरन समुन्द्रे,मनोहर मनपिया,प्रशांत गोरे, शंकर गावंडे,प्रज्वल वाघमारे,विशाल डांगे, दिनेश रामटेके,हेमंत चवरे,निलेश डोईफोडे,नवीन खोब्रागडे,सुबोध चांदोरकर, विनय फुले, अविनाश गजभिये यांच्या सह जवळपास शंभरावर नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com