नागपूर :- २६ नोव्हेंबर २०२३ रोजी संविधान दिनाच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिक मंडळ दिघोरी नागपूर यांच्या वतीने ‘निजला का राजहंस माझा’ या नाटकाच्या नि:शुल्क प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता. २६) दिघोरी येथील नागपूर सुधार प्रन्यास उद्यान, जिजामाता नगर येथे सायंकाळी ६.३० हा प्रयोग होणार आहे.
झाडीपट्टीतील प्रसिद्ध माई नाट्य संपदा वडसाच्या कलावंतांचा सहभाग असलेल्या या नाटकाचा मोफत प्रयोग होणार असल्याची ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या पदाधिका-यांनी दिली. नाटकाचे दिग्दर्शन नरेश गडेकर यांचे असून निर्माता मिलींद येनगंटीवार आहेत. नाटकामध्ये नरेश गडेकर, अमर मसराम, संतोष कुमार, उमेश जाधव, रत्नदीप रंगारी, कृपाल लंजे, गंधर्व गडेकर, आसावरी तिडके, पूजा देवळीकर, मुस्कान, प्रेरणा निगळीकर, श्रद्धा आदी कलावंतांचा सहभाग आहे.
या नाट्य प्रयोगाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.