संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- माजी नगरसेविका वैशाली मानवटकर यांच्या वतीने भागुबाई सभागृह बजरंग पार्क येथे महिलांसाठी सौंदर्य प्रसाधनावर निशुल्क प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचा 400 महिलांनी लाभ घेतला मुंबई येथील तज्ञ मार्गदर्शिका संगीता नायडू यांचे हस्ते दीपप्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून सौंदर्य प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका वैशाली मानवटकर ,अश्विनी गावंडे, शिल्पा सातपुते उपस्थित होते तज्ञ मार्गदर्शिका संगीता नायडू, अश्विनी गावंडे यांनी महिलांना सौंदर्य प्रसाधनावर ,ब्युटी पार्लर, मेकअप, सह केसांची निगा घेणे यावर मार्गदर्शन केले शिबिराला 400 महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन माजी नगरसेविका वैशाली मानवटकर यांनी केले.