सारथीतर्फे युवक-युवतींकरिता मोफत रिमोट पायलट प्रशिक्षण

– ऑफलाईन अर्ज करण्याची २३ सप्टेंबर पर्यंत अंतिम मुदत    

नागपूर :- ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ पुणे, (सारथी) यांच्यातर्फे परभणी व राहुरी येथे मोफत रिमोट पायलट प्रशिक्षणाकरिता २३ सप्टेंबर २०२४ पर्यंत कुणबी-मराठा या लक्षित गटातील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या उपक्रमांतर्गत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटातील शेतकरी, युवक-युवतींना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डिजीटल फारमिंग सोलुशन्स बाय रोबोट ड्रोन ॲन्ड एजवी या डिजीसीए मान्यता प्राप्त ड्रोन प्रशिक्षण केंद्रावर रिमोट पायलट प्रशिक्षण व कृषी आधारित ड्रोन विषयक व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे रिमोट पायलट ट्रेनिंग केंद्रावर रिमोट पायलट प्रशिक्षण घेण्याकरिता सारथीकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी २० सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.१५ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. तर २३ सप्टेंबर २०२४ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठविता येणार आहे.

या उपक्रमासंदर्भात विस्तृत माहिती सारथीच्या http://sarthi-maharashtragov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून या संधीचा फायदा घेत लक्षित गटातील जास्तीत-जास्त युवक-युवतींनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन, नागपूर सारथीचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आयुर्वेदात ‘मॉडर्न ॲप्रोच’ आवश्यक - ना.नितीन गडकरी

Sat Sep 21 , 2024
– श्री विश्व व्याख्यानमालेचे उद्घाटन नागपूर :- येणारा काळ आयुर्वेदासाठी अनुकूल आहे. पण गतीने पुढे जायचे असेल तर आयुर्वेदासाठी भविष्याचे व्हिजन तयार करावे लागेल. उपकरणे/यंत्रे तयार करणाऱ्यांसोबत आयुर्वेदाचा समन्वय साधावा लागेल. आयुर्वेदात मॉडर्न ॲप्रोच आणि डिजीटल इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. तसे झाले तर लोकांचा आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!