नागरी सेवा परीक्षेच्या मुलाखतीसाठी दिल्लीत निःशुल्क ‘अभिरुप मुलाखत प्रशिक्षण’

– महाराष्ट्र सदनात 4 जानेवारी ते 6 एप्रिल दरम्यान प्रशिक्षण

नागपूर :- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2024-25 उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील उमेदवारांसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने 4 जानेवारी ते 6 एप्रिल 2025 दरम्यान नवी दिल्ली येथील जुन्या महाराष्ट्र सदनात ‘अभिरुप मुलाखत प्रशिक्षण 2024-25’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन या कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक तथा भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपुरचे संचालक डॉ. प्रमोद लाखे यांनी केले आहे.

‘केंद्रीय लोकसेवा आयोगा’ च्या नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2024-25 परीक्षेचा निकाल 8 डिसेंबर 2024 रोजी घोषित झाला असून मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने अभिरुप मुलाखत प्रशिक्षण 2024-25 कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमातंर्गत उमेदवारांसाठी अभिरुप मुलाखती सत्रांचे 4 जानेवारी ते 6 एप्रिल 2025 दरम्यान येणा-या प्रत्येक शनिवार व रविवारी दिल्लीतील जुने महाराष्ट्र सदन, कोपरनिकस मार्ग, मंडी हाऊस जवळ, नवी दिल्ली-110001 आयोजन करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी www.siac.org.in या संकेतस्थळावरील सविस्तर सूचना बघावी. अथवा चौकशी संदर्भात directoriasngp@gmail.com या ईमेलवर चौकशी करावी. संपर्कासाठी दुरध्वनी क्रमांक ०७१२-२५६५६२६ या दूरध्वनी व भ्रमणध्वनी क्र. ९४२२१०९१६८ या क्रमांकावर संपर्क साधावा. तथा मुलाखती संदर्भातील प्रवेश अर्ज जुने महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथील मुलाखत केंद्रावर उपलब्ध करुन देण्यात येईल. अर्जासोबत युपीएससीचे मुलाखत पत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र आणि पासपोर्ट आकारातील फोटो आणावीत. तसेच प्रत्येक उमेदवारांनी मुलाखतीस येतांना D.A.F. च्या ०६ छायांकीत प्रती व एक पासपोर्ट फोटो न चुकता सोबत आणावेत, असे प्रसिद्धीप्रत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

निवृत्तीवेतनधारकांना कोषागाराकडे प्रमाणित जीवन प्रमाणपत्र रजिस्टर सादर करण्याचे आवाहन

Sat Dec 28 , 2024
नागपूर :- जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांचे ज्या बँकामधुन निवृत्ती वेतन आरहित होते त्या बँक शाखेकडून जीवन प्रमाणप्रत्राचे रजिस्टर प्रमाणित करण्याचे आवाहन, अपर कोषागारे (निवृत्त वेतन) अधिकारी यांनी केले आहे. निवृत्तीवेतनधारकांनी आपापल्या बँकाकडे पाठपुरावा करुन जीवन प्रमाणपत्राचे रजिस्टर प्रमाणित करण्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना कोषागाराकडुन देण्यात आल्या आहेत. संबंधित बँकांना यापूर्वीच कोषागाराकडून मुदत देण्यात आली होती. निवृत्तीवेतनधारकांनी जीवन प्रमाणपत्राचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!