संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठीत दिव्यांगांना आवश्यक साहित्याचे वितरण..
कामठी ता प्रतिनिधि 15 एप्रिल — 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हेच आपले ध्येय असून दिन दुबळ्या दिव्यांग आणि वयो वृद्धाना आवश्यक साहित्य वितरण करताना मनाला समाधान वाटत आहे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केले. येथील एम टी डी सी सभागृहात आयोजित दिव्यांगांना सहाय्यक उपकरणांचे निशुल्क वाटप कार्यक्रमात ना नितीन गडकरी बोलत होते .
या वेळी सभामंचकावर खासदार कृपाल तुमाने, आ टेकचंद सावरकर, आ एड आशिष जैसवाल,माजी राज्यमंत्री एड सुलेखाताई कुंभारे,माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी,जि प अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, माजी अध्यक्ष रश्मिताई बर्वे, जि प सदस्य मोहन माकडे, वैकटेश कारेमोरे, दिनेश ढोले, माजी जि प सदस्य अनिल निधान, जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर, जि प च्या मुख्य कार्यपालन अधिकारी सौम्या शर्मा, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिपक सेलोकर, माजी सभापति उमेश रडके ,तहसिलदार अक्षय पोयाम,कामठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अंशुजा गराटे, न प कामठी चे मुख्याधिकारी संदीप बोरकर,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संजय माने प्रमुखयाने उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभाग आणि एआयडीपीच्या माध्यमातून कामठी तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटपाच्या दृष्टीने मूल्यांकन शिबिर आयोजित केली होती.पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आज 15 एप्रिल ला एमटीडीसी सभागृहात सहाय्यक उपकरणांचे निशुल्क वाटप करण्यात आले.याप्रसंगी हजारोच्या वर संख्येतील दिव्यांग लाभार्थ्यांनी लाभ घेतला.