नागरी सेवा परीक्षेचे निःशुल्क प्रशिक्षण

नागपूर : ‘संघ लोकसेवा आयोग’ तर्फे घेतल्या गेलेल्या नागरी सेवा (मुख्य) परीक्षा २०२२-२३ च्या परीक्षेचा निकाल 6 डिसेंबरला घोषित झालेला असून मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने अभिरूप मुलाखत प्रशिक्षण- 2023 कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागातर्फे करण्यात झालेले आहे. या कार्यक्रमातंर्गत उमेदवारांसाठी दिल्ली येथील जूने महाराष्ट्र सदन, कोपर्निकस मार्ग मंडी हाऊसजवळ नवी दिल्ली- 110001 येथे अभिरूप मुलाखत सत्राचे आयोजन करण्यात येत आहे.

अभिरूप मुलाखती 29 जानेवारी ते 5 मार्चदरम्यान येणाऱ्या प्रत्येक शनिवार व रविवारी घेतल्या जाईल. तसेच फेब्रुवारीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याची यादी जाहीर झाल्यानंतर अभिरुप मुलाखतीची तारीख वाढविण्यात येईल. प्रशिक्षण कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणून नागपूरच्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ. प्रमोद लाखे यांची शासनातर्फे नेमणूक झालेली आहे.

महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा फायदा घेण्यासाठी www.iasnagpur.com तथा www.siac.org.in या संकेतस्थळावरील सविस्तर सूचना बघावी, अथवा चौकशी संदर्भात directoriasngp@gmail.com यावर ईमेल करावा. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 0712-25656 दूरध्वनी क्रमांक व भ्रमणध्वनी 9960936237 व 9422909168 या क्रमांकावर संपर्क साधावा, मुलाखती संदर्भातील प्रवेश अर्ज जूने महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथील मुलाखत केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी अर्जासोबत लागणारी कागदपत्रे, युपीएससीचे मुलाखत पत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र एक पासपोर्ट साईझ फोटो सोबत आणावीत. तसेच प्रत्येक उमेदवारांनी मुलाखतीस येतांना D.A.F. च्या सहा छायांकीत प्रती न चुकता सोबत आणाव्यात. नागपूरचे भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राचे मुख्य समन्वयक (सी.डी.पी. दिल्ली) तथा संचालक डॉ. प्रमोद लाखे यांनी कळविले.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपालांच्या प्रजासत्ताक दिन चहापानाला मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती

Fri Jan 27 , 2023
मुंबई :- देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी (दि २६) राजभवनाच्या हिरवाळीवर निमंत्रितासाठी चहापानाचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, विविध देशांचे मुंबईतील राजदूत, उद्योजक, सशस्त्र सैन्य दल, प्रशासन व पोलीस दलातील अधिकारी आणि विविध क्षेत्रातले मान्यवर चहापानाला उपस्थित होते. विद्यापीठांमधील नव संशोधन व स्टार्टअपच्या प्रदर्शनाला राज्यपाल, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!