चार वर्षीय शिमाज आजीम आबीद ताजी ने ठेवला जीवनातील पहिला रोजा.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 12 :- येथील मदन चौक रहिवासी आबीद ताजी यांची चार वर्षीय मुलगी शिमाज अजीम आबीद ताजी ने आपल्या जीवणातील पहिला रोजा उपवास ठेवला.सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी 4.15वाजेपासून ते सायंकाळी 5.50पर्यंत रोजाच्या नियमानुसार दिवसभर अन्न व पाणी न घेता उपाशी पोटी राहून अल्लाह प्रति श्रद्धा व्यक्त केली. शिमाज आजीम आबीद ताजी हिने ठेवलेला रोजा थक्क करणारा ठरला आहे.

जनहितासाठी अल्लाह कडे दुवाच्या माध्यमातून शिमाज या चिमुकलीने साश्रु नयनाने साकडे घातले आहे .तर या चिमुकलीने पहिला रोजा ठेवल्याबद्दल शिमाज ताजी हिचे आई, वडील, आजी आजोबा , कडून सर्वत्र कौतुक होत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अनुसुचित जाती आयोगाने मनपा आयुक्तांना बजावली नोटीस

Wed Apr 12 , 2023
 – जाहिरात रद्द करण्याची मागणी अँड. राहुल झांबरे नागपूर :- मनपातर्फे कंत्राटी विधी अधिकारी सहाय्यक या पदाची प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिराती मध्ये नागपूर महापालिका आयुक्तांकडून संविधानिक आरक्षणाचा तरतुदींची पायमल्ली केल्याचा पार्श्वभूमीवर केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाने घेतली गंभीर दखल, आयुक्तांना बजावली नोटीस…प्रकरण आयुक्तांचा अंगाशी येणार….जाहिरात रद्द करण्याची मागणी : नागपूर महापालिकेच्या आस्थापना विभागामार्फत दिनांक २७ मार्च २०२३ रोजी कंत्राटी विधी अधिकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com