नहरात आंघोळीसाठी गेलेले चार विद्यार्थी गेले वाहून

– तुमसर मार्गावरील बोरी येथील इंदिरा गांधी मुलांचे वस्तीगृहातील विद्यार्थी

रामटेक :- तालूक्यातील रामटेक – तुमसर महामार्गावरील रामटेक वरुन दहा कि.मी अंतरावर असलेल्या बोरी येथिल इंदिरा गांधी मुलांचे वस्तीगृहातील चार विद्यार्थी नहरामध्ये आंघोडीला गेले असतांना नहरातील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सविस्तर वृत्त असे की इंदिरा गांधी मुलांचे वस्तीगृह येथिल अधिक्षक यांनी आज शासकीय सुट्टी असतांना सकाळी वस्तीगृहातील काही मुलांना शाळेतील आवारात वृक्षारोपण करण्याकरीता खड्डे करण्याकरीता सांगितले असल्याचे कळले. तेव्हा विद्यार्थ्यांनी खड्डे केले व आंघोळी करीता वस्तीगृहाच्या मागील दोनशे मीटर अंतरावर असलेल्या पेंच डाव्या कालव्याच्या नहरात गेले. पेंच प्रकल्पात या वर्षी १०० टक्के जल साठा भरल्यामुळे सध्या नहराला पाणी सोडल्याने नहर पाण्याने भरुन जात आहे.

वस्तीगृहातील आठ मुले आंघोळी करीता नहरावर गेले. या पैकी पाच मुले नहरात आंघोळी करीता उतरले. त्यात मनदिप अविनाश पाटिल रा. नागपूर वर्ग ११, अनंत योगेश सांबारे रा. नागपूर वर्ग ७ , मंयक कुणाल मेश्राम रा. नागपूर वर्ग ८, मयुर खुशाल बांगरे रा. नागपूर वर्ग ९ हे चारही मुले नहरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह असल्याने वाहून गेले तर कमलेश बाळू देवुळकर वय १६ रा. नेरला ता. मौदा हा मुलगा पोहता येत असल्यामुळे बचावला. आठ पैकी चार विद्यार्थ्थांनी सदर माहीती नहरा लगत असलेल्या शेतकर्‍यांना व शाळेतील अधिक्षकांना दिली. शेतकरी मजूरांनी घटना स्थळाकडे धाव घेतली पण तोपर्यंत मुले पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती. सदर घटनेची माहीती वार्‍यासारखी पसराताच लोकांनी घटनास्थळ व शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. घटनेची माहीती रामटेक पोलीसांना मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश बरकते, तहसिलदार रमेश कोळपे, नायब तहसिलदार भोजराज बडवाईक, पीएसआय मोरे, यांच्यासह रामटेक अरोली पोलीसांचा ताफा दाखल झाला असुन नहर भागात वाहून गेलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेतला पण ते कुठेही आढळले नाही. पोलीसांनी एनडीएफआर चे पथक व स्थानिक मासेमारांना पाचारण केले. पण आंधार होत असल्यामुळे आजची शोध मोहीम थांबविण्यात आली. उद्या १५ ऑक्टोंबर ला पहाटे सहा वाजतापासून शोध मोहीम पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वस्तीगृहात सुविधांचा अभाव

इंदिरा गांधी मुलांचे निवासी वस्तीगृह असुन या ठिकाणी पाचवी ते बारावी पर्यंत शिक्षण असुन मुलाकरीता राहण्यायोग्य सोय नाही , शौचालय आंघोळी करीता स्वतंञ सोय नाही , पिण्याचे पाणी प्लास्टिक डब्बा ठेऊन पाणी दिले जात असते तर राहण्याकरीता मुलांना योग्य सोयसुविधा नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विभागीय लोकशाही दिनात तीन तक्रारी प्राप्त  

Tue Oct 15 , 2024
नागपूर :- विभागीय आयुक्तालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या विभागीय लोकशाही दिनात तीन तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींबाबत उचित कार्यवाहीचे आदेश  कुलकर्णी यांनी संबंधीत शासकीय यंत्रणांना दिले. भंडारा जिल्ह्याच्या मांडवी तालुक्यातील कोटांगले येथील नागरिकाची नैसर्गिक नाला व पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण आणि नैसर्गिक आपत्तीबाबत जुन्या तक्रारी आणि नागपुरातील गांधी झोन मधील अतिक्रमणाबाबत दोन तक्रारींवर आज सुनावणी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com