ISIS च्या चार दहशतवाद्यांना अहमदाबाद विमानतळावरून अटक

अहमदाबाद :- इस्लामिक स्टेटच्या (इसिस) दहशतवाद्यांविरोधात भारतीय संरक्षण यंत्रणांना मोठं यश मिळालं आहे. गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अहमदाबाद विमानतळावरून इसिसच्या चार दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं आहे. एटीएसने अद्याप या चौघांची माहिती जाहीर केलेली नाही. मात्र, या कारवाईबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे चौघेही श्रीलंकेचे नागरिक आहेत. गुजरात एटीएस याप्रकरणाची माहिती देण्यासाठी लवकरच एक पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. हे चार दहशतवादी अहमदाबादला येत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून एटीएसला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीएस आणि इतर पोलीस कर्मचारी अहमदाबाद विमानतळावरच दबा धरून बसले होते. दहशतवादी विमानतळावर दाखल होताच एटीएसने त्यांना बेड्या ठोकल्या.

एटीएसने या दहशतवाद्यांना कुठे नेलंय, दहशतवाद्यांचं अहमदाबादला येण्याचं उद्दीष्ट काय होतं? याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या दहशतवाद्यांकडून मिळालेल्या तिकीटांवरून सूत्रांनी सांगितलं की ते चेन्नईवरून अहमदाबादला आले होते. चारही दहशतवादी आधी कोलंबोवरून चेन्नई आणि मग चेन्नईवरून अहमदाबादला आले होते. त्यांचे हँडलर भारतात त्यांना मार्गदर्शन करत होते. त्यामुळे एटीएस आता या हँडलर्सचा शोध घेत आहे.

हे दहशतवादी चेन्नईमध्ये, अहमदाबादमध्ये ज्या-ज्या लोकांना भेटले होते त्यांच्यापासून आणि त्यांना भारतात मार्ग दाखवणाऱ्या हँडलर्सपासून देशाला मोठा धोका आहे. त्यामुळे गुजरात एटीएससह देशातील इतर संरक्षण यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हे दहशतवादी अहमदाबादमध्ये त्यांच्या हँडलरच्या संदेशाची वाट पाहत होते. त्याआधीच एटीएसने त्यांच्या मुसक्या आवळल्या. या दहशतवाद्यांना पकडलं असलं तरी ऐन निवडणुकीत चार दहशतवादी भारतात घुसले होते, या बातमीने संरक्षण आणि गुप्तचर यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील 13 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 48.66 टक्के मतदान

Mon May 20 , 2024
मुंबई :- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील एकूण 13 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे सरासरी 48.66 टक्के मतदान झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे : धुळे- 48.81 टक्के दिंडोरी – 57.06 टक्के नाशिक – 51.16 टक्के पालघर- 54.32 टक्के भिवंडी- 48.89 टक्के कल्याण – 41.70 टक्के ठाणे – 45.38 टक्के मुंबई उत्तर – 46.91 टक्के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com