संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मानसी लॉन जवळ सायंकाळी पाच दरम्यान चार तरुण मंडळी दोन दुचाकीने हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवीत कुठलातरी घातक कृत्य करण्याच्या बेतात असताच ऐन वेळेवर गस्तवर असलेल्या जुनी कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून दहशत माजविणाऱ्या चारही आरोपीना ताब्यात घेण्याची यशस्वी कारवाही केली परिणामी अनुचित घटना टळली. या कारवाहितुन ताब्यात घेतलेल्या चारही आरोपी विरुद्ध भादवी कलम 4/25भारतीय हत्यार बंदी कायदा ,34,सहकलम महाराष्ट्र पोलीस कायदा 136 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून एक मोठा लोखंडी धारदार चाकू,एक लहान लोखंडी चाकू,वेगवेगळ्या कंपनीचे तीन मोबाईल ,दोन दुचाकी असा एकूण 1 लक्ष 6 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक चारही आरोपीमध्ये शेख रफिक शेख रशीद वय 25 वर्षे रा संघर्ष नगर,मो साहेब आलम अन्सारी संमसूद्दीन अन्सारी वय 29 वर्षे रा टेका नाका, मोहम्मद मौसीम अन्सारी मो मकसुद अन्सारी वय 28 वर्षे रा संघर्ष नगर, शहजाद खान रेहनत खान वय 26 वर्षे रा उप्पलवाडी नागपूर असे आहे.ही यशस्वी कारवाही डीसिपी श्रवण दत्त,एसीपी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांच्या मार्गदर्शनार्थ जुनी कामठी पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.