जबरी चोरी करणाऱ्या चार आरोपींना अटक, चार गुन्हे उघडकीस

नागपूर :- फिर्यादी हितेश बाबुराव पुणेकर वय ३० वर्ष रा. टिमको दादरापुल, प्रायमरी शाळेजवळ हे त्यांचे ॲक्टिवा मोपेड गाड़ी क. एम.एच ४९ बि.सी २६१२ ने टिमकी चौक येथून जात असता त्यांचे ॲक्टिवा गाडीला मोटरसायकल क्र. एम.एच ४९ सि.ए ३१८६ चे चालकाने पाठीमागुन धड़क मारली. फिर्यादीने गाडी थांबविली असता मोटरसायकल वरील दोन इसम तसेच समोरून पायदळ आलेल्या इसमाने मिळून, संगणमत करून, फिर्यादीस हातबुक्काने व  रॉडने हातापायाला मारून जखमी केले. पायी आलेल्या इसमाने फिर्यादीस चाकुचा धाक दाखवून फिर्यादीचे खिश्यातील ५००/- रू च्या चार नोटा एकूण २०००/- रु.जबरीने हिसकावून घेतले व जातांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली, पळुन गेले. फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्ट वरून आरोपींविरूध्द कलम ३२४, ३२३, ५०६, ३४ भादवी अन्वये गुन्हा नोंदवून तहसिल पोलीसांनी आरोपींचा शोध घेवून मोटरसायकल वरील आरोपी १) अमन सूर्यकांत चावरे वर्ष २५ वर्ष २) अंकीत सुर्यकांत चावरे वय २३ वर्ष दोन्ही रा. तांडापेठ, जुनी वस्ती, पाचपावली यांना अटक केली होती. आरोपींचा साथिदार क. ३) सुजल चंद्रशेखर चिनकूरे वय १९ वर्ष लॉट न. ८४, कामना नगर, कळमणा, नागपूर यास दिनांक २४.०७. २०१३ रोजी अटक करण्यात आली. अटक आरोपींची सखोल विचारपूस केली असता आरोपींनी वरील गुन्हयाची कबुली दिली.

आरोपींचे ताब्यातुन गुन्हयात वापरलेले दोन लोखंडी रॉड, एक चायनिज चाकु व रोख २,०००/- रू तसेच गुन्हयात वापरलेले होन्डा शाईन एम.एच ४९.सि. ए ३१८६ किमत २०,०००/- रु ची जप्त करण्यात आली. दिनांक १५,०७,२०२३ मे ११.०० ते १६.०० वा चे दरम्यान फिर्यादी फिरोज अहमद खान वय ३५ वर्ष रा. सेवासदन बिल्डींग मागे, हंसापुरी, नागपूर यांनी त्याची होन्डा कंपनीची पॅशन गाडी क्र. एम.एच ४९. ए.बी ७९७८ ही मुंशी मस्जिद जवळ, राणा कॉम्प्लेक्सचे पार्किंग मध्ये पार्क केली असता, अज्ञात आरोपीने चोरून नेल्याने कलम ३७९ भा. दं. वो अन्वये गुन्हा नोंद होता. तहसिल पोलीसांनी मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून व तांत्रीक तपास करून आरोपी सचिन परसराम पाकर वय ३५ वर्ष रा. नाईक तलाव तांडापेठ पाचपावली यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता आरोपीने वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीस अटक करून त्याचे ताब्यातील वरील वाहन किमती ४०,०००/- रु ने जप्त करण्यात आले. आरोपीची सखोल विचारपूस केली असता त्याने पोलीस ठाणे सिताबर्डी हदीतुन पांढया रंगाची ॲक्टीवा गाडी एम.एच ३१ डी.पो ९३४९ किमती २०,०००/- रुची व पोलीस ठाणे जरीपटका हद्दीतुन सुझुकी अॅक्सेस क. एम.एच ४९ ए.डी ७६८३ किमती ४०,०००/- रु ची चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीने ताब्यातुन नमुद वाहने जप्त करण्यात आले आहे. तहसिल पोलीसांनी एकुण चार आरोपींना अटक करून एक जबरी चोरी व तिन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहे.

वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त परि क. ३, सहा. पोलीस आयुक्त कोतवाली विभाग यांचे मार्गदशनाखाली पोनि विनोद पाटील, पोनि गुन्हे विनायक गोल्हे, सफौ राजेश ठाकुर, पोहवा संजय शाहु, संदीप गवळी, नापअ प्रशांत दयाने नजार शेख, रोशन तिवारी, पोअ वैभव कुळसंगे, कुणाल कोरवे, रोहिदास जाधव यांनी केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यात डोळ्यांच्या साथीचा शिरकाव

Wed Jul 26 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- मागिल काही दिवसापासून वातावरणात बदल झाल्यामुळे कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील अनेक नागरिक डोळ्यांच्या संसर्गाने त्रस्त झाले आहेत. तर अनेकाना डोळे लाल होणे, डोळ्यांना सूज येणे असाही त्रास होत आहे. वातावरणात झालेला बदल आणि अधूनमधून कोसळणारा मुसळधार पाऊस ,ढगाळ वातावरण असे बदल सातत्याने होत आहे.याचा परिणाम म्हणून डोळ्यांचा संसर्ग वाढत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!