-दोन डोस घ्या ; प्रतिबंधात्मक उपाय योजना पाळण्याचे आवाहन
नागपूर : सरत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी नवीन वर्षाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहे. कोरोनाचे सावट अद्याप संपले नसून नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस घ्यावेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळाव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.
आज मानकापूर जिल्हा क्रीडा संकुल येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील पाच जिल्हे कोरोना उद्रेकाच्या काठावर आहेत. यामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे व नागपूर या शहराचा समावेश आहे. केंद्र शासनाने या पद्धतीचे संदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अंमल करावा. मास्क वापरावे,शारीरिक अंतर ठेवावे, विनाकारण गर्दी करू नये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाने आपले दोन्ही डोस पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
नवीन वर्ष आरोग्यदायी जाण्यासाठी राज्यशासनाने म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची ,आपल्या स्वतःची, काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क असून जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी शुभेच्छा संदेशात केले आहे.