संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 21:-भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशात शेती सिंचनाची, विजेची सोय नव्हती, शाळा महाविद्यालये नव्हते, आरोग्य सेवा नव्हती , सशस्त्र साठा नव्हता अशा परिस्थितीत कांग्रेस पक्षाने या देशाचे नेतृत्व करीत आपल्या शासनकाळात देशात मोठमोठे उद्योगधंदे, विमाने व पाण्याचे जहाजांची निर्मिती केली, मिसाईल, टॅंक, रणगाडे बनविले , सिंचनाकरिता मोठमोठे धरणे बांधले , देशात दळणवळण करिता रस्ते व रेल्वेचे जाळे पसरविले या,माध्यमातून विकासाची गंगा हाती धरत या देशाला आधुनिक बनविण्याकरिता माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी यांनी आधुनिक क्रांती आणून देशातील सर्व लोकांना हातात मोबाईल ,कम्प्युटर,इंटरनेट ची सोय करून दिली तरी दुर्दैवाने सत्तेत बसलेले विरोधी पक्षातील आरोप करतात की कांग्रेस पक्षाने इतक्या वर्षात देशाच्या विकासात काय केले ? तर मी त्यांना सांगतो की भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा या देशात एक सुई सुद्धा तयार होत नव्हती त्या काळात स्व राजीव गांधींनी या देशाचे नेतृत्व करीत आधुनिकता उभारुन विकासाची क्रांती रोवीत एक नवीन ऊर्जा दिली असे मौलिक प्रतिपादन कामठी नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष प्रमोद उर्फ गुड्डू मानवटकर यांनी आज कामठी नगर कांग्रेस कमिटी कार्यलयात माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
याप्रसंगी कांग्रेस शहराध्यक्ष कृष्णा यादव, संदीप जैन, आशिष मेश्राम, मनोज यादव,राशीद शेख, धीरज यादव,कुसुमताई खोब्रागडे, बेबीनंदा रामटेके आदी उपस्थित होते.
भारत देशाला घडविण्यात माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधींचे मोठे योगदान-माजी नगराध्यक्ष गुड्डू मानवटकर
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com