कोराडी :- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा चे अध्यक्ष व माजी खासदार रामदास तडस यांनी समाजभूषण नवनिर्वाचित आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे कोराडी निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेऊन, त्यांचे तसेच देवेन्द्र फडणविस यांचे नेतृत्वात राज्यात भाजपा पक्षाचे भरघोस विजयाबद्दल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व त्यांचे पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी प्रांतिक सहसचिव, विदर्भ प्रभारी बळवंतराव मोरघडे, नागपूर विभागीय युवा आघाडी अध्यक्ष प्रवीण बावनकुळे, युवा राज्य उपाध्यक्ष विपिन पिसे, जेष्ठ पदाधिकारी रमेशभाऊ उमाटे व महेश बावनकुळे आदी हजर होते.