नागपूर :- महानगरपालिका लोकसभा व विधानसभा निवडणुका समोर असतांना भारतीय जनता पक्षाने जिल्ह्याचे अध्यक्ष यांची नावे घोषित करण्यात आली त्यावेळी शहराचे अध्यक्ष बंटी कुकडे यांना संधी मिळाली आणि माजी आमदार सुधाकर कोहळे यांच पुन्हा आगमन होऊन त्यांना जिल्हाध्यक्षपदाची निवड करून जबाबदारी सोपविली. सुधाकर हे शिक्षक होते. त्यांनी शिक्षक पदाचा राजीनामा दिला आणि ते दक्षिण नागपूरचे भाजपचे आमदार राहिलेले आहे. आता ते माजी आमदार आहे. परंतु पक्षाने त्यांना पुन्हा राजकारणात काम करण्याची संधी व जबाबदारी सोपवून पक्षातर्फे त्यांचे स्वागत केले.
दक्षिण नागपुरातील आमदार म्हणून ओळखल्या जाणारे माजी आमदार सुधाकर कोहळे हे उत्कृष्ट काम करणारे व यांची क्षमता कार्य करण्याची आहे म्हणूनच दक्षिण नागपुरात सुधाकर कोहळे यांना ओळखले जाते. दक्षिण भागातील विकास कामाचा विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे एकमेव सुधाकर कोहळे हे सतत कार्यकर्ते म्हणून समाजासाठी त्यांनी पाऊल उचलले मुळात ते शिक्षक म्हणून काम करत होते. तेव्हापासूनच राजकारणात येऊन नगरसेवकापासून तर आमदारापर्यंत मजल गाठली.
या भागातील गरीब लोकांच्या समस्या, लोकांचे प्रश्न, सर्वांचेच ते काम धावून काम करत होते. कोणाचेही प्रश्न मार्गी लावत होते. ते समाजासाठी, गरीब लोकांसाठी, त्यांनी आपले कामधंदे सोडून लोकांना मदत केली. त्यांनी दक्षिण नागपूरचा विकास केला. गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावले म्हणूनच त्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या नावाची घोषणा करून त्यांना ग्रामीणचे जिल्हाध्यक्षपद घोषीत केले व जबाबदारी सोपीविली. त्यांचे भाजप पक्षाने स्वागत करून मनोबल वाढविले. दक्षिण नागपूरातील व इतर भागातही भारतीय जनता पक्षाला खरोखरच समोर नेणार हि क्षमता त्यांच्यातच आहे असे तेथील ज्येष्ठ नागरिकांनी आपले मत व्यक्त केले. आपापल्या प्रतिक्रिया त्यांनी भाऊंच्या विषयी दिल्या आणि त्यांचे मनोबल वाढविले जिल्हाध्यक्ष पदाची निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देत भारतीय जनता पक्षाला समोर नेणारचं असे यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.
सुधाकर कोहळेनी समाजभवनाची दुरुस्ती व गार्डनमध्ये ग्रीन जिम लावली तसेच काही लोकांच्या जागा, प्लॉट्स, बिल्डरच्या घशात न जाऊ देता त्या जागा राखून ठेवल्या. जेव्हा ते NIT चे ट्रस्टी होते त्यावेळेस त्यांनी हे कार्य केले व नागरिकांना मदत केली. ते आमदार नसतांनाही लोक त्यांच्याकडे धाव घेत होते. कारण गरिबांचे प्रश्न सोडविणारा फक्त सुधाकर कोहळेच आजही त्यांच्यात माणसे जुळवण्याची क्षमता आहे. लोकांचं काम करून पुढे जाण्याची क्षमता फक्त कोहळे मध्येच आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सरस्वती नगरातील ज्येष्ठ नागरिकांनी दिल्याने त्यांचे मनोबल वाढले.
राजा मारोती एनआयटी गार्डन जेष्ठ नागरिक कृती समिती च्यावतीने उकंडराव चौधरी योग प्रशिक्षक यांनी भाऊंबद्दल प्रतिक्रिया मांडली.
सुभेदार ले आऊट गार्डनचे काम सुद्धा केले. जानकीनगर ते सरस्वती नगरच्या गार्डनचेही काम त्यांनीच केले. सर्व नागरिकांचे हसत मुखत काम करत जनतेचे मत, कामे, समजून घेणारे एकमेव सुधाकर कोहळे नागपुरात उत्कृष्ट काम करणारे त्यांची ठेव आहे असे सुनील बिंगेवार यांनी सांगितले. म्हणूनच त्यांना एक संधी मिळाली. असं नागरिकांना कळताताच त्यांनी आनंद व्यक्त केला व आपआपल्या प्रतिक्रिया मांडल्या. सरस्वती नगरातील ज्येष्ठ नागरिक तसेच समाजासाठी कार्य करणारे सुनील बिंगेवार यांनी सुद्धा आपले मत व्यक्त केले.
वाढदिवसाच्या दिवशी शनिवारी सुर्योदय लोकसेवा प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना करून १ जुलै रोजी उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी १ जुलै रोजी भाऊंचा वाढदिवस होता. त्यादिवशी लोकांची प्रचंड गर्दी होती. त्यादिवशी आपल्याच वाढदिवसाबरोबर वस्तीतील ज्येष्ठ नागरिकांचा सुद्धा त्यांनी वाढदिवस साजरा केला आणि आश्वासन दिले की, माझ्या वाढदिवसाबरोबरच ज्येष्ठ नागरिकांचाही वाढदिवस साजरा करणार असे आश्वासन दिले. कृष्णराव खंडाळे यांनी सुधाकर कोहडे यांचे चांगले उत्तम व्यक्तिमत्व आणि ते सर्वांना घेऊन चालणारे एकमेव सुधाकर मध्येच क्षमता आहे. दक्षिण भागाचा विकास तर केलाच पण पुढीलही ग्रामीणमध्ये त्यांनी चांगली कारकीर्द करावी व आपल्या पक्षाला समोर न्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
2008 पासून दक्षिण भागामध्ये सुधाकर कोहळेनी चांगलेच कार्य केले आता ही कार्य सुरू आहे. कारण त्यावेळेस ते नगरसेवक होते. दक्षिण भागाचा चांगलाच विकास केला म्हणून त्यांना आजही विकास पुरुष म्हटले जाते. दक्षिण भागातील प्रत्येक गार्डनमध्ये समाजभवन बांधण्यासाठी मोलाचा वाटा होता व असाच विकास ग्रामीण भागातील करत राहावे अशी अपेक्षा आजही ते करत आहे असे मत प्रदीप गणोरकर यांनी मांडले. सरस्वती नगर मधील बहुउद्देशीय संस्थेच्या मंदिराला भाऊंनी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर करून मंदिरातील ग्राउंड मध्ये गट्टू लावणे, शेड बनविणे, हे काम प्रवीण ठाकरे यांच्या मागदर्शानात करण्यात आले. या गार्डनचे नियोजन, मंदिरातील व्यवस्थितपणे कामे मार्गी लावून सहभाग केला. संदीप शेन्डे यांनी हि प्रतिक्रिया मांडली. तसेच महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष सिद्धू कोमजवार यांनी भाऊंविषयी आमदारकीच्या कारकिर्दीत दक्षिण नागपूर मतदार संघातील विकास पुरुष म्हणजे सुधाकर कोहळे यांनी दक्षिण भागातील विकास केला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
यावेळी सरस्वतीनगर, जानकी नगर, शिवशकी नगरचे नागरिक याप्रसंगी सुनील बिंगेंवार, उकंडराव चौधरी, सिद्धू कोमजवार, देवराव प्रधान, प्रदीप गणोरकर, संदीप शेन्डे, दिपक खेडकर, किशोर पवार, डॉ.आर.बी.चौधरी, रवी राठोड, काशीनाथ नखाते, राज बघेल, पांडे, मंगेश ढोणे, दिपक केतकर, कृष्णराव खंडाळे आणि वस्तीतील अनेक नागरिकांनी त्यांच्या बद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या.