माजी मंत्री सुनील केदार रात्री उशिरा रुग्णालयात दाखल, डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याने रुग्णालयात उपचार

नागपूर :-नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाने त्यांना दोषी ठरवल्यानंतर ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुनील केदार यांना शासकीय रुग्णालयात रात्री उशिरा दाखल करण्यात आले आहे. तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्यानं केदार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुनील केदार यांची न्यायालयातून सेंट्रल जेलला जाण्यापूर्वी वैद्यकीय चाचणी करण्यात आली. सुनील केदार यांना तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याने अस्वस्थ वाटत होते त्यामुळे केदार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या निगराणीत केदार यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. तर इतर आरोपींना जेलमध्ये रवाना करण्यात आले आहे.

डॉक्टरांच्या निगराणीत अतिदक्षता विभागात उपचार सुरू

सुनील केदार यांना न्यायालयाने नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणी दोषी ठरवत पाच वर्षे शिक्षा सुनावली होती. त्यानंतर न्यायालयातून नागपूर सेंट्रल जेलला रवाना करण्यापूर्वी पोलिसांनी नियमाप्रमाणे वैद्यकीय चाचणीसाठी सुनील केदार आणि इतर आरोपींना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेले होते. रुग्णालयात गेल्यानंतर केदार यांनी मायग्रेनचा त्रास असल्याने तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याची तक्रार केली. डॉक्टरांनी इसीजी काढले असता थोडे बदल आढळून आले. हे बदल आधीचे आहे की आताचे आहेत हे डॉक्टर तपासणार आहे. तूर्तास तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीत अतिदक्षता विभागात केदार यांच्यावर उपचार सुरु आहे.

सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर सुनील केदार यांना सौम्य शिक्षेची मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती. सुनिल केदार हे लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना कमीत कमी शिक्षा द्यावी असा युक्तीवाद केदार यांच्या वकिलांनी केला होता. मात्र, कोर्टाने केदार यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

2002 मध्ये 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा

नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील खटल्याचा निकाल काल लागला. यामध्ये काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 2002 मध्ये 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हा केदार बँकेचे अध्यक्ष होते. ते या खटल्यातील मुख्य आरोपीसुद्धा आहेत. पुढे खाजगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले होते. केदार तसेच अन्य काही जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनोज जरांगे पाटील म्हणतील तसा GR काढला पाहिजे, छगन भुजबळ यांचा टोला 

Sat Dec 23 , 2023
मुंबई :- सरकारला दिलेल्या २४ डिसेंबरच्या अल्टिमेटवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. आता पुढचं लक्ष म्हणजे बीडची सभा आहे. अशातच काल मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार हल्लाबोल करण्याऐवजी जरांगे पाटील यांच्यावर उपरोधिक टीका आणि टोलेबाजी केली. अल्टिमेटमला दोन दिवस बाकी असताना जरांगे पाटील यांनी परभणीच्या शेलू गावातून सरकारला पुन्हा इशारा दिलाय. देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना आरक्षण देण्यापासून रोखू […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!