उद्धव ठाकरे, राहुल गांधींना मतदारच तडीपार करतील – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा घणाघात

मुंबई :- भ्रष्ट नेत्यांच्या अटकेविरोधात एकत्र येत दुखवटा साजरा करण्यासाठी रामलीला मैदानावर जमणा-या सर्व भ्रष्ट नेत्यांना त्यांच्या पराभवाची गॅरंटी असल्यानेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असभ्य भाषेत टीका केली. अशा लायकी नसलेल्यांना मतदारच निवडणुकीत तडीपार करतील अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी, संजय राऊत यांच्यावर मंगळवारी घणाघात केला. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित होते. राजकीय उंची आणि बौद्धीक कुवत नसलेल्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पातळी सोडून टीका करणे थांबवावे अन्यथा भाजपा कार्यकर्त्यांना त्यांची लीला दाखवावी लागेल असा इशारा ही राणे यांनी विरोधकांना दिला.

राणे म्हणाले की अब की बार भाजपा तडीपार म्हणणा-यांनी स्वत:ची लायकी तपासून पहावी. कोरोना काळात गरीबांच्या टाळूवरचे लोणी खाणा-यांना सूज्ञ मतदारच यावेळी घरी बसवतील. मोदी सरकारवर मॅच फिक्सिंग चा आरोप करणारे उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व विरोधक, भ्रष्ट नेत्यांच्या समर्थनासाठी एकत्र येतात ही संतापजनक बाब आहे. तपास यंत्रणांच्या धाडी दरम्यान अव्वाच्या सव्वा रोकड मिळत असताना, अनेक घोटाळे समोर येत असताना भ्रष्ट मंत्र्यांवर होणा-या कायदेशीर कारवाई विरोधात ही मंडळी गळे काढत आहेत. लोकशाही तत्वांनुसार कायद्याचे पालन करत सर्व भ्रष्ट नेत्यांवर कारवाई होत असून गरीब सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काचा पैसा पंतप्रधान मोदी मिळवून देतील असा विश्वास श्री.राणे यांनी व्यक्त केला. मोदींच्या कार्यकाळातील देशाची होणारी प्रगती विरोधकांना सहन होत नसल्यानेच जळफळाटातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपावर बिनबुडाची टीका होत आहे असेही ते म्हणाले.

राणे यांनी देशाच्या प्रगतीचे द्योतक असलेली अर्थव्यवस्थेशी संबंधित आकडेवारीच पत्रकार परिषदेत सादर केली. पंतप्रधान मोदीजींच्या समर्थ नेतृत्वाखाली देशाच्या विकासाची तुफान वेगाने घोडदौड सुरू असून यंदा ‘अब की बार ,400 पार’ चे उद्दीष्ट एनडीए नक्की साध्य करेल असा विश्वास राणे यांनी बोलून दाखवला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विविध संघटनांचा ना. गडकरी यांना पाठिंबा

Wed Apr 3 , 2024
नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना लोकसभा निवडणुकीसाठी विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. इंडियन अनएम्प्लॉइड इंजिनियर्स असोसिएशन, क्षत्रिय करणी सेना आणि भारतीय रिअलटर्स असोसिएशन या संघटनांनी पत्राद्वारे आपले समर्थन कळविले आहे. ‘आपण नागपूरसह संपूर्ण भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अतुलनीय कामगिरी केल्यामुळे नागपूरचे आणि देशाचे नाव उंचावले आहे. त्यामुळे आपणास जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे,’ असे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com