संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या येरखेडा ग्रामपंचायतचे माजी सदस्य मनीष जैस्वाल वय 45 वर्षे रा यशोधरा नगर कामठी यांचा आज दुपारी 1 दरम्यान राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार सदर मृतक हा आपल्या राहत्या घरात असताना आज दुपारी 1 दरम्यान अचानक छातीत जोमाने असह्य अशा वेदना झाल्या. दरम्यान घरमंडळींनी त्वरित उपचारार्थ एका खाजगी रुग्णालयात नेले असता उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यानी आधीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.पोलिसांनी सदर घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे तर मृतकाच्या पाठीमागे बराच मोठा आप्तपरिवार आहे.