कामठीचे माजी नगरसेवक सिद्धार्थ रंगारीच्या भाच्याची नेपाळमध्ये गगनभरारी

संदीप कांबळे,कामठी

-पारशिवनीचे खेळाडू नेपाळमध्ये चमकले!

साऊथ एशियन मॉन्टेक्स बॉल क्रिकेट चॅम्पियनशिप यशस्वी वैभव दरवईने षटकार ठोकून केला नेपाळचा पराभव
कामठी ता प्र 27:- भारतात आयपीएल सामने गाजत असताना तिकडे नेपाळमध्ये टी-१० स्पर्धेत पारशिवनीचे खेळाडू घाम गाळत होते. त्याची मेहनत फळास आली अन् भारताने नेपाळला पराभूत करीत साऊथ एशियन मॉन्टेक्स बॉल क्रिकेट चॅम्पियनशीप जिंकली. या स्पर्धेत नेपाळ, बांगलादेश, भूटान, श्रीलंका आणि भारताचा संघ सहभागी झाला होता.यात पारशिवनी येथील एकूण ५ खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत आपल्या गावाचे नाव मोठे केले. यात प्रामुख्याने उज्ज्वल शिवशंकर गिरडकर, विक्की यादवराव बडवाईक, दर्पण कृष्णाजी पाटील, वैभव अंकुश दरवई, गोपाळ पंढरी खंड यांचा प्रामुख्याने समावेश होता. यातील दर्पण पाटील हे कामठी नगर परिषद चे माजी नगरसेवक सिद्धार्थ रंगारी यांचा भाचा असून एका लहानशा गावाचे नाव विदेशात प्रसिद्धीस नेल्याने यावर गर्व बाळगत सदर खेळाडूचे मनोबल वाढत यांचा विजयाचा जल्लोष म्हणून आज कामठी च्या राहुल बुद्ध विहार सभागृहात विजेता दर्पण कृष्णाजी खोब्रागडे चा सिद्धार्थ रंगारी कुटुंबियांच्या वतीने शाल , श्रीफळ देऊन सत्कार करून खूप कौतुक करण्यात आले.याप्रसंगी नागरिकांच्या वतीने दर्पण खोब्रागडे वर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.याप्रसंगी नगरसेविका सरोज रंगारी, रोहित रंगारी, दिशांत रंगारी, प्रीतम मेश्राम,सिमरन रंगारी, अमोल मेश्राम, माजी नगराध्यक्ष नीरज यादव,शिवा गुजर, देवानंद कांबळे, संदीप कांबळे,निखिलेश चव्हाण, मोनू शंभरकर,तेजस डोईफोडे, सलीमभाई, सुनील बडोले, प्रमोद खोब्रागडे, नरेश फुलझेले, भांगे , सुनील चहांदे , नितु दुबे, आदी उपस्थित होते.

अंतिम सामना नेपाळसोबत झाला. या सामन्यात नेपाळने भारतासमोर जिंकण्यासाठी ८५ धावांचे लक्ष्य दिले होते. केवळ ९० षटकांत या धावा भारतीय संघाला काढायच्या होत्या. हे आव्हानात्मक लक्ष्य असले तरी भारतीय फलंदाजांनी दोन घटके उर्वरित असतानाच सामना खिशात टाकला. सामन्याचा शेवट वैभव अंकुश दरवई या फलंदाजाने षटकार ठोकून केला. भारतीय संघात उज्ज्वल शिवशंकर गिरडकर, विक्की यादवराव बडवाईक, दर्पण कृष्णा पाटील, वैभव अंकुश दरवई, गोपाल पंढरी अखंड, हर्ष मोरे, आदित्य उजवणे, रोहन धाने, खुशबीर सिंग, अराध्या माहुरे, अनमय कोली ,रुद्राक्ष वानखडे, दुर्गा सिंग, राहुल पाल या खेळाडूंचा समावेश होता. ही स्पर्धा २१ ते २५ एप्रिल २०२२ या काळात नेपाळ येथे पार पडली. या संघाचे प्रशिक्षक म्हणून नरेश बोहरे पानी जबाबदारी सांभाळली. मॉन्टेक्स बॉल क्रिकेट फेडरेशनच्या अंतर्गत या स्पर्धेत भारतीय संघ खेळला. तत्पूर्वी पारशिवनी येथील पाचही खेळाडू उत्तम क्रिकेट खेळत असले तरी त्यांना संधी मिळत नव्हती. म्हणून त्या पाचही खेळाडूंनी नागपुरात आयोजित स्पर्धेत आपला संघ उतरविला त्यात त्यांनी सामना जिंकला. त्यानंतर यवतमाळ येथे राज्यस्तरीय सामने पार पडले. तिथेही पारशिवनीच्या खेळाडूंनी उत्तम प्रदर्शन केले. त्याच बळावर गोंदियात राष्ट्रीय स्पर्धा पार पडली. त्यातही पारशिवनी येथील खेळाडूनी चमकदार कामगिरी केली. याच बळावर मंग आहे. मॉन्टेक्स बॉल क्रिकेट फेडरेशनने नेपाळ येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पारशिवनी येथील पाच खेळाडूंना संधी दिली. त्याच संधीचे सोने करीत मग त्या खेळाडूंनी नेपाळ, श्रीलंका, भूटान आणि बांगलादेशच्या संघाला धूळ चारत साऊथ एशियन मॉन्टेक्स बॉल क्रिकेट चॅम्पियनशीपवर आपले नाव कोरले. त्याने स्पर्धेत विजय मिळवल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले. तत्पूर्वी पारशिवनीच्या मुलांनी केलेल्या कामगिरीमुळे पारशिवनी सह कामठी गावाचे नाव नाव मोठे झाले असे म्हणत माजी नगरसेवक सिद्धार्थ रंगारी, अमोल पनवेलकर यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नागपूर जिल्ह्यातील गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठीचा एकत्रीत प्रस्ताव पाठवा :- मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

Wed Apr 27 , 2022
मुंबई, दि.२७: नागपूर जिल्ह्यातील माहे ऑगस्ट-सप्टेबर २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती,पिके,रस्ते फळबांगाचे अतोनात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या भागातील नुकसानीचा एकत्रित प्रस्ताव पाठवावा तसेच प्रलंबित प्रस्तावावर कार्यवाही करावी अशा सुचना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केल्या. सिंहगड निवासस्थानी नागपूर जिल्ह्यातील गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईबाबत बैठक पार पडली.यावेळी पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार,मृद व जलसंधारण सचिव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com