पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नागपूर मेट्रोला भेट

• चव्हाण यांनी तिकीट घेत मेट्रोने केला प्रवास

• नागपूर आंतरराष्ट्रीय शहराच्या दिशेने :  पृथ्वीराज चव्हाण

नागपूर : पूर्व मुख्यमंत्री व विधानसभा सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी आज नागपूर मेट्रो प्रकल्पाला भेट दिली. चव्हाण यांनी सिताबर्डी इंटरचेंज ते शंकर नगर मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रोने प्रवास केला. सर्वप्रथम त्यांनी महा मेट्रोच्या मेट्रो भवनला भेट दिली. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी त्यांचे स्वागत केले.   

या भेटीदरम्यान डॉ. दीक्षित यांनी चव्हाण यांना नागपूर मेट्रो रेल प्रकल्पा बद्दल संपूर्ण माहिती प्रदान केली तसेच महा मेट्रो तर्फे पुणे मेट्रो तसेच अन्य प्रकल्पाची माहिती देण्यात आली तसेच महा मेट्रो तर्फे विश्व कीर्तिमान स्थापित अश्या वर्धा मार्गा वरील डबल डेकर पुला बद्दल माहिती प्रदान केली या व्यतिरिक्त स्टेशन परिसरातील प्रवाशांच्या सोयीसाठी देण्यात आलेल्या विविध सुविधाबद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली.

या भेटीदरम्यान  पृथ्वीराज चव्हाण यांनी शंकर नगर मेट्रो स्टेशन येथे व्हिजिटर बुक मध्ये नमूद केले कि, नागपूर मेट्रो रेल प्रकल्प भरपूर पुढे गेला असून मेट्रो स्टेशनचे डिझाईन सुंदर असून मोठ्या प्रमाणात नागरिक मेट्रोचा उपयोग करीत असून नागपूर आंतरराष्ट्रीय शहराच्या दिशेने ने मोठे पाऊल घेतले आहे. तसेच महा मेट्रोचे मेट्रो भवन देखील सुंदर असून नागपूर मेट्रो प्रकल्पाची अतिशय सुयोग्यपणे अंमलबजावणी झाल्या बद्दल महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

या वेळी पूर्व मंत्री राजेंद्र मुळक महा मेट्रोचे संचालक अनिल कोकाटे कार्यकारी संचालक उदय बोरवणकर उपस्थित उपस्थित होते. दीक्षित यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना स्मृतीचिन्ह भेट दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आनंदाचा शिध्याचा 97 टक्के शिधापत्रिकाधारकांनी घेतला लाभ -अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांची विधानपरिषदेत माहिती

Sat Dec 24 , 2022
नागपूर : कोरोना काळात गरिबांची आर्थिक स्थिती खालावली होती. दिवाळीमध्ये त्यांच्यावर आर्थिक बोजा पडू नये म्हणून राज्य शासनाने प्राधान्य कुटुंब, अंत्योदय अन्न योजना आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात आनंदाचा शिधा 100 रुपयात देण्याचा निर्णय घेतला. राज्यात आनंदाचा शिध्याचा 97 टक्के शिधापत्रिकाधारकांनी लाभ घेतला असून ही सर्व प्रक्रिया ई-लिलावाद्वारे झाल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांची विधानपरिषदेत दिली. विरोधी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com