– विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकला दिली भेट
नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बहुप्रतिक्षेत सिंथेटिक ट्रॅकला माजी अॅथलिट्स बलविंदरसिंग धलीवाल यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी विद्यापीठाच्या क्रीडा विभागातर्फे बलविंदरसिंग धलीवाल यांचा सत्कार करण्यात आला.
स्पोर्ट्स सायकॉलॉजीच्या राष्ट्रीय परिषदेसाठी माजी ऑलिम्पियन बलविंदर सिंग धलीवाल हे नागपूरात आले होते. त्यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकला भेट दिली. अंतिम टप्यात असणाऱ्या या ट्रॅकची माहिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी विद्यापीठाचे नवनिर्वाचित सिनेट सदस्य वामन तुर्के यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी ऑलिम्पियन आणि राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पदक विजेते बलविंदरसिंग धलीवाल यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. तसेच नागपूर विद्यापीठाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या सिंथेटिक ट्रॅकच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. यावेळी विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद सुर्यवंशी, साई केंद्राचे प्रशिक्षक सायली वाघमारे, स्मिता बाकरे, जयेंद्र ढोले, विजय घिचारे, जीत ठाकरे, आंतरराष्ट्रीय खेळाडू डॉ. रंधावा, डॉ. नितीन जंगीटवार, गणेश वाणी, दीपाली येरकर, रुतिका किन्हेकर आदी उपस्थित होते.