वनरक्षक पदो. वनपाल संघटनेचे अध्यक्ष अजय पाटील यांचा वनविभागाला इशारा
नागपूर :- संपूर्ण महाराष्ट्रातील वन्यजिव विभाग,वन विभाग मार्फत दिनांक ०१.११.२०२२ ते ०६.११.२०२२ पर्यंत वन्यजीव ब व्याघ्रगणना करणे सबंधी एन.टी.सि.ए चे आदेश प्राप्त आहेत. सद्यास्थितित संपूर्ण जंगलात उंच गवत वाढलेले आहे. यावर्षी झालेल्या प्रचंड पावसामुळे जंगलात मोठ्या प्रमाणात गवत व नॆसर्गिक झाडोरा वाढला असल्यामुळे, जंगलात गस्त करणे सुद्धा धोकादायक आहे अशातच सकाळी ७ वाजता जंगलात हजर होवून तुटपुंज्या मनुष्यबळाच्या आधारे ट्रान्झिट लाईनवर फिरणे स्वतःच्या जीवितास धोक्यात टाकण्यापलीकडे काहीही नाही. म.रा.वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजयभाऊ पाटील यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय, नागपूरचा सतत पाठपुरावा केला वन्यजीव प्रगणना कार्यक्रम जर नोव्हेंबर महिन्यात होणार असेल तर वनरक्षक व वनपालांचा जीविताची हमी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी दिल्या शिवाय माझा कोणताही वनरक्षक व वनपाल वन्यजीव प्रगणणेत सहभागी होणार नाही. असे स्पष्ट व निक्षुण वनविभाग व वन्यजीव विभागाच्या अधिकार्यांना सांगितले. व याव्दारे समस्त वनरक्षक व वनपालांना वन्यजीव प्रगणेत सहभाग न घेण्याबाबत आवाहन अजय पाटील यांनी केले आहे. प्रधान मुख्यवनसंरक्षक वन्यजीव तसेच वनबलप्रमुख यांना संघटने मार्फत सदर बाबतीत संघटने मार्फत पत्र देण्यात आले आहे. वरिष्ठ कार्यालयाने मुख्यवनसंरक्षक कार्यालयावर सदर बाबतीत ज्या ठिकाणी प्रगणना करणे शक्य असेल त्या ठिकाणी प्रगणना करणे संबंधी सुचना दिलेल्या आहेत. पंरतू महाराष्ट्रातील ११ सर्कल मध्ये वेगवेगळ्या वेळेस प्रगणना झाल्यास, चुकीची प्रगणना होईल. कारण वाघ आपली टेरिटोरी बदलत राहत असल्याने एका वेळेस प्रगणना होणे गरजेचे आहे. परंतू ३,४ सर्कल मध्ये फेब्रुवारी महिण्यात प्रगणना करण्याचे ठरविले आहे. सदर निर्णयाचे अजय पाटील यांनी स्वागत केले आहे.पंरतू इतरही सर्कल ने जानेवारी किव्हा फेब्रुवारी महिण्यात प्रगणना केल्यास वन कर्मचार्यांसाठी सोईस्कर होईल.
तसेच जर वनाधिकाऱ्यांनी जबरदस्तीने प्रगणना करावयास लावल्या तर सर्व वनमजूर, वनरक्षक आणि वनपाल यांच्या सुरक्षतेची हमी लिखित रूपात द्यावी अन्यथा वन्यजीव प्रगणना होणार नाही अशी ठाम भुमिका महाराष्ट्र वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांनी घेतली आहे.