नागपूर :- राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्सव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी नागपूर येथे येत आहेत. ते सकाळी 11 वाजता महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या बैठकीस एफ.डी.सी.एम. भवन हिंगणा रोड, अंबाझरी येथे उपस्थित राहतील. श्री. मुनगंटीवार रात्री नागपूर येथे मुक्कामी राहणार असून 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता चंद्रपूरकडे प्रयाण करतील.