वन विभागाची पदभरती मानवी हस्तक्षेप विरहित! तोतयांपासून सावध राहण्याचे तरुणांना आवाहन

मुंबई :- राज्यात वन विभागाच्या वतीने सुरू असलेल्या वनरक्षक व तत्सम पद भरतीसाठी निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून ही प्रक्रिया टीसीएस या संगणक क्षेत्रातील तज्ञ कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. टीसीएस मार्फत राबविली जाणारी वनविभागाची ही पदभरती प्रक्रिया संपूर्णपणे संगणकीकृत असून या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेपास अजिबात वाव नाही, हे युवकांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे. उमेदवारांना भरतीसाठी निहित पद्धतीने सर्व परीक्षा आणि मुलाखती पार पाडणे बंधनकारक आहे, अशी माहितीही वनविभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

वन विभागाच्या पद भारतीत नोकरी लावून देतो असे सांगून, काही तोतया व्यक्ती आपण अमुक तमुक अधिकारी आहोत किंवा कुणाचे तरी नातेवाईक आहोत असे भासवून उमेदवारांशी संपर्क साधत असल्याच्या तक्रारी दूरध्वनीद्वारे प्राप्त झाल्या आहेत; त्याची उच्च पातळीवरून तातडीने दखल घेतली गेली आहे. यासंदर्भात युवकांनी सावध राहावे आणि मानवी हस्तक्षेपास वाव नसलेल्या या भरती प्रक्रियेत कुणीही अशाप्रकारे वन विभागात नोकरी लावून देतो, असे सांगत असेल तर तातडीने स्थानिक जिल्हा पोलिस अधिक्षकांशी संपर्क साधून त्याची तक्रार दाखल करावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण रोजगाराभिमुख कौशल्य विकसित करणारे, विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्रामध्ये जाणीवजागृती कार्यक्रम

Wed Aug 2 , 2023
अमरावती :- नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे रोजगाराभिमुख कौशल्य विकसित करणारे धोरण आहे, या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सर्वच प्रकारचे शिक्षण हे क्रेडीट बेस्ड, आऊटकम बेस्ड तसेच लवचिक आहे. इंटर्नशिप, अप्रेंटस्शीप, क्षेत्रभेटच्या माध्यमातून विद्याथ्र्यांमध्ये अधिकाधिक रोजगाराभिमुख कौशल्य निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे, असे विचार डॉ. वैशाली गुडधे यांनी व्यक्त केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्र, ग्रंथालय, माहितीशास्त्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com