नागपूर :- सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष व सीआयपीसी वुमन क्लब या अलाईड संघटनेचे पेट्रॉन डॉ. मिलिंद जीवने यांना दक्षिण कोरिया येथील विश्व शांती शिखर परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. १८ ते २१ सप्टेंबर दरम्यान सेऊल शहरात ही परिषद होईल. डॉ. जीवने १६ सप्टेंबर रोजी परिषदेकरिता रवाना होणार आहेत. सेलचे सूर्यभान शेंडे, शंकर ढेंगरे, अँड. एम.पराते, प्रा.नितीन तागडे, अँड. राखी आहुजा यांच्यासह मित्रमंडळीने डॉ. जीवने यांचे अभिनंदन केले आहे.