सलग दुसऱ्या दिवशी अज्ञात वाहनाच्या धडकेने हरणाचा मृत्यु..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 28 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खापरखेडा बाह्य वळण मार्गावर पाण्याच्या शोधात भटकंती करीत असता रस्ता ओलांडत असलेल्या हरणाला अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत हरणाचा जागीच अपघाती मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना काल सकाळी 10 दरम्यान घडली असून या घटनेला चोवीस तासाचा कालावधी लोटत नाही तोच सलग दुसऱ्या दिवशी आज सकाळी पुनश्च एका हरणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली

घटनेची माहिती मिळताच जुनी कामठी पोलीस तसेच फॉरेस्ट विभागाचे अधिकाऱ्यांनी सदर हरणाचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहे.या मार्गावर स्पीड ब्रेकर तसेच पथदिवे ची सोय करण्यात यावे या मागणीसाठी प्रमेन्द्र यादव,कामरान जाफरी आदींनी प्रशासनाकडे मागणी रेटून धरली आहे.मात्र संबंधित प्रशासन यांच्या मागणीला केराची टोपली दाखवत आहे.तर दोन दिवसात दोन अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली तरीही प्रशासनाला जाग येईना तेव्हा कुण्या मानवाची जीवितहानी चा सपाटा सूरु होईल तेव्हा प्रशासन जागे होईल का!असा प्रश्न येथील प्रमेन्द्र यादव ,कामरान जाफरी करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी नगर परिषद च्या सन 2023-24चा अर्थसंकल्प अंदाजपत्रक मंजूर..

Tue Mar 28 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 28 :- सन 2023-24 या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक प्रशासक श्याम मदनूरकर यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या सभेत लेखापाल अमित खंडेलवाल, धर्मेश जैस्वाल यांनी सादर केलेल्या सन 2023-2024च्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्प अंदाजपत्रकास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. अर्थसंकल्प सादर करताना महसुल कर आणि भरपाई, महसुली अनुदाने, नगर परिषद मालमत्तेपासूम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com