संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-कामठीतील शासकीय धान्य गोडाऊन इमारत मृतावस्थेत
कामठी :- कामठी शहर हे विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जात असताना मागील दोन वर्षांपूर्वी माजी मंत्री सुनील केदार यांच्या शुभ हस्ते कामठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य गोदाम बांधकामाचे मोठ्या थाटात भूमीपूजन करण्यात आले हे बांधकाम झाल्यावर निर्मित होणारे धान्य गोदाम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीत शेतकऱ्यांच्या उपयोगात येणार आहे तर याच तुलनात्मक दृष्टिकोनातून विचार केल्यास स्वस्त धान्य दुकांनदाराना वितरित करण्यात येणारा धान्यमाल सोयीचे राहावे यासाठी प्रभाग क्र 15 अंतर्गत येणाऱ्या एमएसईबी कार्यालय जवळील दोन धान्य गोडाऊन इमारत मागिल दहा वर्षांपासून निकामी व मृतावस्थेत आहेत यावर संबंधीत विभागाने कृपादृष्टी केल्यास मृतावस्थेत असलेले हे धान्य गोडाऊन उपयोगात येऊ शकतात मात्र या दोन गोडाऊन ची डागडुजी वा पुनर्बांधणी करण्यासाठी कुणीही सरसावले नसल्याने हे गोडाऊन निकामी ठरले आहेत.
कामठी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात येणाऱ्या धान्याचा साठा सोयीने ठेवण्यासाठी पूर्वी 750 मेट्रिक टन चे क्षमतेचे दोन गोडावून बांधण्यात येऊन उपयोगात आणल्या गेले होते मात्र या दोन्ही गोडाऊन मध्ये धान्यासाठी जागा अपुरी पडत असल्याचे कारण पुढे करीत एप्रिल 2013 पासून विकतूबाबा नगर स्थित वखार महामंडळ ची इमारत उपयोगात आणण्यात आली .हे धान्य गोडाऊन इमारत मृतवस्थेत पडलेल्या सदर दोन्ही धान्य गोडाऊन क्षमतेपेक्षा अधिक आहे तेव्हापासून याच धान्य गोडाऊन मध्ये पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात येणारा धान्यसाठा सुरक्षित ठेवण्यात येत आहे तर 2013 पासून अनुपयोगात असलेले शिवशक्ती नगर मध्ये अस्तित्वास असलेले धान्य गोडाऊन इमारत ह्या धूळखात पडले असून अवैध व्यवसायिकांचे माहेरघर बनले आहे.
या गोडाऊन चे छताचे टिनाचे पत्रे उडाले असून सदर गोडाऊन निकामी पडले आहे या गोडाऊन इमारत मध्ये रात्री बेरात्री अनैतिक कामे सुद्धा होत असल्याची चर्चा आहे .तर निकामी असलेले या गोडाऊन ची डागडुजी करीत वा त्याची पुनर्बांधणी केल्यास सदर गोडाऊन उपयोगात येऊ शकते मात्र 2013 पासून अनुपयोगात असलेल्या ह्या धान्य गोडाऊन इमारत कडे कुणी लक्षच पुरविले नाही ही एक शोकांतीकांच मानावी लागेल!