विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासास आठवड्यातुन एक दिवस दप्तर मुक्त शाळा उपक्रम राबविणार – मुख्याध्यापक बढिये यांची घोषणा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सर्वांगीण विकास साधत असताना विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य मिळायला हवे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व शारीरिक विकासासाठी आठवड्यातुन एक दिवस शनिवारी ” दप्तर मुक्त शाळा ” हा उपक्रम धर्मराज प्राथमिक शाळेत राबविणार असल्याची घोषणा मुख्याध्यापक खिमेश बढिये यांनी पालकसभेत केली.

धर्मराज प्राथमिक शाळा कांद्री-कन्हान येथे आज (दि.२८) ला वर्ग चौथीच्या पालकांची पालक सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनंजय कापसिकर तर प्रमुख पाहुणे म्हणुन शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष विधिलाल डहारे, मुख्याध्यापक खिमेश बढिये उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती देवीचे पूजन करुन सभेला सुरुवात करण्यात आली.

यावेळी बोलताना मुख्याध्यापक खिमेश बढिये म्हणाले की, शाळा हे बालमनांचे संस्काराचे केंद्र आहे. मुलांमध्ये असलेल्या गुणांना अधिक उजाळा देण्यासाठी भाषण, गायन यासोबतच कांतीकारकांच्या पुस्तकांचे वाचन यासह नेतृत्व घडविणा-या उपक्रमाला प्राधान्य देण्यात येईल. पालकांना विविध शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती, सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती, ओबीसी शिष्यवृत्ती, भटक्या विमुक्त प्रवर्गाची शिष्यवृत्ती, एकल पालक शिष्यवृत्ती, दिव्यांग शिष्यवृत्ती ची माहिती देऊन सदर शिष्यवृत्ती प्रस्ताव १५ सप्टेंबर पर्यंत जमा करण्याचे आवाहन केले. या वेळी इयत्ता चौथीच्या धनंजय कापसिकर यांची पुन्हा अध्यक्ष म्हणुन फेरनिवड करण्यात आली. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास घडवुन आणण्यासाठी विद्यार्थ्यांचा गृहपाठ तपासावा, अभ्यासपुरक उपक्रमात सहकार्य करावे, नियमितपणे अभ्यासाची प्रगती जाणुन घ्यावी, शालेय प्रशासनाची शिस्त कायम ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याध्यापक खिमेश बढिये यांनी केले. यावेळी कापसिकर यांनी विद्यार्थ्यांना ओळखपत्र व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शाळा प्रशासनाने सहकार्य करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन भिमराव शिंदेमेश्राम यांनी तर आभार चित्रलेखा धानफोले यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनास चित्रलेखा धानफोले, भिमराव शिंदेमेश्राम, शारदा समरित, महादेव मुंजेवार, सुनिता मनगटे, सुलोचना झाडे, नंदा मुद्देवार यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचा नवीन अध्यादेश जारी

Fri Jul 28 , 2023
मुंबई :- महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत आरोग्य संरक्षण 5 लाखापर्यंत करण्याची घोषणा 28 जून 2023 रोजी जरी झाली असली तरी अद्याप शासकीय निर्णय जारी न झाल्यामुळे नागरिकांना कोणताही लाभ मिळत नव्हता. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी शासनाच्या निदर्शनास आणून देताच सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी तत्काळ कार्यवाही करत नवीन अध्यादेश जारी केला. आरटीआय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!