संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 16 :- गावाचा विकास हाच एक ध्यास या विचारसरनेतून ग्रा प निवडणुकीत भाजप प्रणित उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.केंद्रात व राज्यात भाजप ची सत्ता असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन डिजिटल इंडियाची सुरुवात झाली आहे.तेव्हा गावाच्या विकासासाठी ग्रा प निवडणुकीत भाजप प्रणित उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन माजी मंत्री व विधांनपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
आगामी १८ डिसेंबरला होणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या येरखेडा ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदाच्या निवडणुकीकरिता शेवटच्या दिवशी भाजप प्रणित आघाडीच्या आदर्श विकास पॅनल उमेदवाराकरिता माजी मंत्री व प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचार सभा घेऊन प्रचाराची रणधुमाळी केली . नागपूर जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या येरखेडा ग्रामपंचायत व भाजप प्रणित आदर्श विकास सरपंच पदाचे उमेदवार राजकिरण बर्वे व 17 सदस्य उमेदवाराच्या प्रचाराकरिता माजी मंत्री माजी ऊर्जामंत्री व प्रदेश भाजप अध्यक्ष विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी येरखेडा येथील रविदास नगर ,शिवपंचायत मंदिर जुना येरखेडा ,बीबी कॉलोनी येथे प्रचार सभेत केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना मोठ्या प्रमाणात आणून विकास कामाचे आश्वासन देऊन उमेदवारांना विजयी करण्याकरिता जाहीर आवाहन केले .यावेळी नागपूर जिल्हा भाजप अध्यक्ष अरविंद गजभिये, नागपूर जिल्हा परिषद चे माजी विरोधी पक्ष नेता अनिल निधान ,प्रदेश व्यापारी आघाडीचे पदाधिकारी अजय अग्रवाल, नागपूर जिल्ह्याचे भाजप पदाधिकारी अजय बोढारे, तालुका भाजपा अध्यक्ष किशोर बेले, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष किरण राऊत , कामठी पंचायत समिती माजी सभापती उमेश रडके, माजी उपसभापती देवेंद्र गवते, माजी सरपंच मंगला कारेमोरे,मनीष कारेमोरे, उन्मेष महल्ले ,कपिल गायधने, प्रमोद वर्णम सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.