संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभात कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, डॉ. सुनील साकुरे , डॉ अनिल चिताळे यांच्या उपस्थितीत समाजकार्य महाविद्यालय कामठी येथील प्रा. निशांत माटे यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. ‘कार्बन ट्रेडिंग उद्योगाची राजकीय अर्थव्यवस्था आणि समुदायाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय स्थितीवर परिणाम’ हा त्यांचा शोधप्रबंधाचा विषय होता. प्रा. माटे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण बदलावर अभ्यास करून अपारंपरिक ऊर्जास्रोत प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण व आदिवासी समुदायाच्या आर्थिक विकास कसा साधता येऊ शकतो याविषयी अत्यंत मूलभूत संशोधन त्यांनी केले असून सोबतच वातावरणामध्ये होणारे बदल, जागतिक तापमानवाढ, कार्बन उत्सर्जन, कार्बन क्रेडिट, कार्बन व्यापार या महत्त्वाच्या विषयांवर विविधांगी संशोधन करून पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाच्या उपाययोजना सुचवलेल्या आहेत. त्यांचे संशोधन आदिवासी आणि ग्रामीण समुदायासाठी तसेच पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी अत्यंत हितकारक असल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. प्रस्तुत संशोधन त्यांनी प्रा. डॉ.सुनील साकुरे यांच्या मार्गदर्शनात पूर्ण केले. त्यांच्या या यशाबद्दल समाजकार्य महाविद्यालय कामठीचे संस्थापक अध्यक्ष माजी कुलसचिव डॉ. पुरणचंद्र मेश्राम, कार्यकारी प्राचार्य रुबीना अन्सारी, पर्यावरणतज्ज्ञ प्रवीण मोते, स्मिता पाटील – माटे, प्रा. दिनेश पाटील यांनी डॉ. निशांत माटे यांचे अभिनंदन केले.